शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतेचा सामना करण्यासाठी सज्ज व्हा; पुढचे ५ दिवस पारा २ ते ४ अंशाने वाढणार!

By निशांत वानखेडे | Updated: April 29, 2024 20:11 IST

अवकाळी पावसाचे सावट संपले; सर्वाधिक ४२.३ अंश तापमान अकाेल्यात

निशांत वानखेडे, नागपूर: गेल्या अनेक दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा व राज्याच्या काही भागावर असलेले अवकाळी पावसाचे सावट आता संपले आहे. संपूर्ण एप्रिल महिन्यात पावसाळ्यासारखा वाटलेला उन्हाळा आता आपल्या रंगात येण्याची शक्यता आहे. यापुढे पारा हळूहळू वर चढणार असून नागरिकांना दिवसा उन्हाचे चटके, उष्णता व रात्री उकाड्याचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे लागेल.

एप्रिल महिन्याचे २० ते २२ दिवस आकाशात ढग आणि अवकाळी पावसाचे सावट हाेते. नागरिकांना माेजक्या दिवशी उन्हाचे चटके बसले व उष्णतेची जाणीव झाली. दमट उकाड्याचा अनुभव मात्र नागरिकांनी घेतला. साेमवार २९ एप्रिल हा या अवकाळी वातावरणाचा शेवटचा दिवस राहणार असून महाराष्ट्रात वीजा, वारा, गारा व अवकाळी पावसासारख्या वातावरणापासून सुटका मिळेल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.

यापुढे मध्य भारत, विदर्भ, मराठवाडा, खांदेश व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात दिवसाचे कमाल तापमान २ ते ४ अंशाने वाढण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हा ताप तीव्र हाेणार आहे. दिवस व रात्रीच्या दोन्हीही तापमानात मात्र हळूहळू वाढीची शक्यता असून जन-जीवनाला असह्य उष्णता व उकाड्याशी सामना करावा लागेल. दक्षिण मध्य महाराष्ट्रात उष्णतेचा परिणाम अधिक जाणवेल. काेकणात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान साेमवारी अवकाळीचा अंदाज असला तरी नागपूरसह विदर्भाचा पारा वर उसळला. गाेंदिया वगळता सर्व १० जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंशाच्या वर पाेहचले. नागपूर २४ तासात २.७ अंशाने वाढून ४०.१ अंशावर गेले आहे. सर्वाधिक ४२.३ अंश तापमान अकाेला येथे नाेंदविण्यात आले.

गाेंदियाचा पारा ४.४ अंशाने उसळला. चंद्रपूर, वर्धा, यवतमाळात तापमान ४१ अंशावर आहे. रात्रीच्या तापमानात अंशत: घट नाेंदविण्यात आली असली तरी ३० एप्रिलपासून पुढे त्यात वाढ हाेण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :nagpurनागपूर