शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

काळजी घ्या! सुट्यांमध्ये बाहेर फिरुन आलेल्यांना ‘व्हायरल’चा ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2023 18:58 IST

Nagpur News जे उन्हाळी सुट्यांमध्ये बाहेरील देशात किंवा काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये फिरून परत आलेले आहेत त्यांच्यात ‘व्हायरल’ दिसून येत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

सुमेध वाघमारे 

नागपूर : उपराजधानीतील वाढते तापमान असह्य होत असताना ‘व्हायरल इन्फेक्शन’मध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषत: जे उन्हाळी सुट्यांमध्ये बाहेरील देशात किंवा काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये फिरून परत आलेले आहेत त्यांच्यात ‘व्हायरल’ दिसून येत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ताप, सर्दी, खोकला व काही रुग्णांमध्ये अतिसाराचे लक्षणे दिसून येत आहे. बहुसंख्य रुग्णांमध्ये हे सौम्य लक्षणे असलेतरी काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. 

   सध्या सकाळी कडक उन्ह, दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा परिणाम शरीरावर होतो. परंतु जे उन्हाळी सुटी घालविण्यासाठी इतर राज्यात गेलेले आहेत ते परतून आल्यावर त्यांच्यात व्हायरल इन्फेक्शन दिसून येत असल्याचे संसर्गजन्य रोग विषेज्ञ डॉ. नितीन शिंदे यांनी सांगितले. त्यांच्यातून इतरांना पसरत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, ही लक्षणे सौम्य आहेत. परंतु औषधोपचार करणे आवश्यक आहे. 

-पाश्चात्य देशातून आलेल्यांनाही ‘व्हायरल’ज्येष्ठ जनरल फिजिशियन डॉ. जय देशमुख यांनी सांगितले, पाश्चात्य देशात फिरून नागपुरात परत आलेल्यांमध्येही ‘व्हायरल इन्फेक्शन’ दिसून येत आहे. विशेषत: जे १५-२५ ग्रुपने गेले होते त्यांच्यात ‘व्हायरल’चे प्रमाण अधिक आहे. 

-पाच दिवस राहतात लक्षणेडॉ. देशमुख म्हणाले, ‘व्हायरल’च्या रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, ताप, घश्यात खवखव ही लक्षणे दिसून येतात. साधारण चार-पाच दिवस लक्षणे असतात.

- जोखमीच्या रुग्णांनी काळजी घ्यायला हवीहृद्य विकार, उच्चरक्तदाब, मधुमेह, किडनी, यकृताचा आजार, अवयव प्रत्यारोपण झालेल्या या जोखमीच्या रुग्णांना व्हायरल झाला असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करायला हवे. वयोवृद्धांनीही अधिक काळजी घ्यायला हवी. विशेषत: मास्क वापरणे आवश्यक असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्य