शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! दिवाळीच्या मिठाईत होऊ शकते भेसळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:27 IST

दिवाळीत मिठाई खरेदी करीत असाल तर सावधान. मिठाईमध्ये भेसळ होत असल्याची बाब समोर आली आहे. याला गंभीरतेने घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आतापर्यंत खाद्य तेलापासून ते खव्यापर्यंतचे ५५ नमुने ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत पाठविले आहे. हे नमुने शहरातील बड्या हॉटेलपासून ते गल्लीबोळ्यातील हॉटेलपर्यंतचे असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देएफडीएने घेतले खाद्यपदार्थांचे ५५ नमुने

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दिवाळीत मिठाई खरेदी करीत असाल तर सावधान. मिठाईमध्ये भेसळ होत असल्याची बाब समोर आली आहे. याला गंभीरतेने घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आतापर्यंत खाद्य तेलापासून ते खव्यापर्यंतचे ५५ नमुने ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत पाठविले आहे. हे नमुने शहरातील बड्या हॉटेलपासून ते गल्लीबोळ्यातील हॉटेलपर्यंतचे असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.दिवाळीत मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते ही बाब हेरून भेसळ माफिया भेसळयुक्त मिठाई बनवितात. आरोग्याला घातक ठरू शकणारी मिठाई बाजारात आल्याने नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज आहे. दिवाळीतील मागणीचा विचार करून मोठ्या प्रमाणात मिठाई बनविली जात असतानाच त्यासाठी बनावट तसेच निकृष्ट दर्जाचा मावा वापरला जातो. विशेष म्हणजे हा मावा शेजारील छत्तीसगड व मध्य प्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणात नागपुरात दाखल होत आहे. ही भेसळ सहजासहजी ओळखता येत नसली तरी नागरिकांना संभाव्य धोका लक्षात घेत खात्रीशीर स्विट््सच्या दुकानातूच मिठाई खरेदी करावी लागणार आहे. मिठाईच्या क्षेत्रात नामवंत असलेल्या दुकानदारांकडूनही मिठाई घेतल्यास धोका कमी होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी जागरूकता दाखविणे हाच उपाय ठरतो. दिवाळीची मिठाई बनविताना दूषित आणि भेसळयुक्त पदार्थांचा वापर केला जातो. शिवाय मिठाई बनविणारे कारागीर आणि त्यांचे किचन अत्यंत गलिच्छ असल्याने दूषित मिठाईचा धोका अधिकच वाढतो. नुकतेच अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळीच्या खाद्य तेलाचा मोठ्या साठ्यावर धाड टाकून कारवाई केली. गेल्या काही दिवसात खाद्यतेल, मावा, बेसन व इतरही पदार्थांचे या विभागाने ५५ नमुने ताब्यात घेतले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल येताच त्यानुसार कारवाई केली जाणार आहे. भेसळयुक्त मिठाईपासून सावध राहण्याचे आवाहनही ‘एफडीए’ने केले आहे.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागnagpurनागपूर