शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘फेक न्यूज’ पसरवताय..सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 10:46 IST

‘सबकुछ ऑनलाईन’च्या जमान्यात प्रसारमाध्यमेदेखील ‘ई’ चावडीवर सहजपणे उपलब्ध होतात. परंतु अनेकदा कुठलीही शहानिशा न करता नागरिकांकडून ‘फेक न्यूज’ एकमेकांना पाठविण्यात येतात.

ठळक मुद्देचार वर्षांत १२ गुन्हे दाखलकारवाईचे प्रमाण कधी वाढणार ?

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सबकुछ ऑनलाईन’च्या जमान्यात प्रसारमाध्यमेदेखील ‘ई’ चावडीवर सहजपणे उपलब्ध होतात. परंतु अनेकदा कुठलीही शहानिशा न करता नागरिकांकडून ‘फेक न्यूज’ एकमेकांना पाठविण्यात येतात. मात्र असे करणे महागात पडू शकते. २०१६ पासून नागपूर शहरात अशा प्रकारे ‘फेक न्यूज’ विविध ‘सोशल मीडिया’वर ‘पोस्ट’ करणे अनेकांना महाग पडले. ‘लोकमत’ला प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार चार वर्षांत १२ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. ‘फेक न्यूज’चे एकूण प्रमाण लक्षात घेता गुन्ह्यांची संख्या अतिशय कमी असून कारवाईचे प्रमाण कधी वाढणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.मागील काही वर्षांत ‘स्मार्टफोन्स’ वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. विविध वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्यांचे ‘वेबपोर्टल्स’ असून त्यावर नियमितपणे बातम्या ‘अपडेट’ होतात. परंतु अनेकदा ही वर्तमानपत्रे किंवा वृत्तवाहिन्यांचे नावाखाली खोटे वृत्त तयार केले जाते व ते ‘सोशल मीडिया’वर पसरविले जाते. याचप्रमाणे अनामिक म्हणूनदेखील अनेकदा खोटे वृत्त विविध ‘प्लॅटफॉर्म्स’वर ‘पोस्ट’ करण्यात येते. एखाद्या परिचिताने पाठविले म्हणून ते इतरांकडूनदेखील समोर ‘फॉरवर्ड’ होते.असे प्रकार दररोज घडत असतात. परंतु असे करणे हा प्रकार ‘सायबर’ गुन्ह्यांमध्ये येतो. असे करणाऱ्यांविरोधात ‘आयटी अ‍ॅक्ट’मधील कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करता येऊ शकतो. २०१६ सालापासून नागपुरात ‘फेक न्यूज’संदर्भात विविध तक्रारी झाल्या व नागपूर पोलिसांनी एकूण १२ प्रकरणात गुन्हे दाखल केले. २०१६ मध्ये ४, २०१७ मध्ये २, व २०१८ साली तीन व २०१९ मध्ये आॅगस्ट महिन्यापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले.

‘फेक प्रोफाईल’विरोधात कठोर पावले हवी‘सोशल मीडिया’वर ‘फेक प्रोफाईल’ तयार करून इतरांना त्रास देणे किंवा अश्लाघ्य भाषेत टीकाटिप्पणी करणे असे प्रकारदेखील होत असतात. राज्यातच अशा प्रकारच्या हजारो ‘फेक प्रोफाईल’ असतील. हादेखील ‘आयटी अ‍ॅक्ट’चा भंगच आहे. मात्र यासंदर्भात हवी तशी कारवाई होताना दिसून येत नाही. २०१७ साली राज्यभरात ‘फेक प्रोफाईल’ तयार करणाºया केवळ चार जणांविरोधातच गुन्हे दाखल झाले.तक्रारीसाठी लोकच पुढे येत नाहीतदररोज विविध ‘प्लॅटफॉर्म’वर ‘फेक न्यूज’ दिसून येतात. यातील काही बातम्या या सामाजिक सौहार्द बिघडविणाºया किंवा समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्यादेखील असू शकतात. यासंदर्भात तक्रारीसाठी लोक पुढे येत नाही. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.‘एनसीआरबी’च्या अहवालात प्रथमच नोंद‘एनसीआरबी’च्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) अहवालातदेखील ‘फेक न्यूज’ प्रकरणी दाखल गुन्ह्यांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारची नोंद प्रथमच दिसून येत आहे. २०१७ सालच्या अहवालानुसार महाराष्ट्रात असे उपद्व्याप करणाºया ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यात नागपुरातील दोन गुन्ह्यांचा समावेश होता.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम