शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

सायबर क्राईमपासून सतर्क राहा : ब्रिजेश सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:19 IST

काळानुसार झपाट्याने स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यासोबतच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. एका छोट्या चुकीमुळे अनेक लोकांची खासगी माहिती सहजरीत्या हॅक होत आहे. त्यामुळे स्मार्ट फोनचा वापर करणाऱ्यांनी सतर्क राहिल्यास सायबर गुन्हे थांबविता येतील, असे मत राज्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देअ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी माहिती मिळवासोशल नेटवर्किंग साईटचा वापर करताना सजग राहण्याची गरज

आॅनलाईन लोकमतनागपूर : काळानुसार झपाट्याने स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यासोबतच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. एका छोट्या चुकीमुळे अनेक लोकांची खासगी माहिती सहजरीत्या हॅक होत आहे. त्यामुळे स्मार्ट फोनचा वापर करणाऱ्यांनी सतर्क राहिल्यास सायबर गुन्हे थांबविता येतील, असे मत राज्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले.बुधवारी लोकमत भवनाला माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी सदिच्छा भेट देऊन संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी चर्चा करताना ते बोलत होते. उल्लेखनीय म्हणजे सिंह हे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी सांगितले की, सायबर गुन्हेगारांना कुणाचा डाटा किंवा खासगी माहिती हॅक करताना अधिक श्रम करावे लागत नाही. आज त्यांच्याजवळ असे अनेक तंत्र आहेत, ज्याच्या आधारे ते हॅकिंग करतात. त्यामुळे सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करताना यूझर नेम व पासवर्ड बनविताना विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे, परंतु असे होत नाही. सहजपणे आठवू शकतील असे यूझर नेम व पासवर्ड ठेवण्यात येतात. याच मानसिकतेचा फायदा हॅकर्स उचलतात. स्मार्ट फोनचा वापर करणारे त्यांच्या फोनवर आलेल्या अनेक सूचनांकडे दुर्लक्ष करतात. सिस्टीम अपडेट करीत नाहीत. ही चुकीची बाब आहे. सध्याच्या काळात स्मार्ट फोन, लॅपटॉपसारखा वापरल्या जातो. आर्थिक व्यवहारांसोबत सर्वच कामे स्मार्ट फोनच्या साह्याने करण्यात येत आहेत. प्रत्येक कामासाठी यूझर नेम व पासवर्डची गरज असते. परंतु अनेक उपभोक्ते असेही असतात जे सर्वच कामांसाठी एकाच प्रकारचा पासवर्ड व यूझर नेम वापरतात. ही अतिशय धोकादायक बाब आहे. उपभोक्त्यांनी यापासून सावध राहणे गरजेचे आहे. त्यांच्यासोबत अमरावती व नागपूर विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, नागपूरचे जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, चंद्रपूरचे जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके उपस्थित होते.आधार सुरक्षितसिंह यांनी सांगितले की, आधारकार्डला बँकेशी लिंक करण्याबाबत अनेक नागरिकांमध्ये संभ्रम आहे. अनेक नागरिकांना ही शंका आहे की, फोन व बँकेशी आधार लिंक केल्यास त्यांची गोपनीय माहिती म्हणजे बायोमेट्रिक डाटा सार्वजनिक होईल. परंतु असे होत नसून आधार पूर्णपणे सुरक्षित आहे. कुणाचाही बायोमेट्रिक डाटा सार्वजनिक होण्याचा कोणताही धोका नाही. नागरिकांनी शंकांपासून दूर राहून आपले आधार बँक खात्याशी लिंक करावयास हवे.सायबर गुन्हे रोखण्यासाठी व्यापक तयारीसिंह यांनी सांगितले की, सायबर गुन्हे रोखण्यासाठी व्यापक तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत. आगामी दिवसात काही योजना लागू करण्यात येतील. सायबर गुन्हे थांबविण्यासाठी अधिकाऱ्यांची चमू गठित करण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.माहिती व जनसंपर्कास गतीसिंह यांनी सांगितले की, राज्यात माहिती व जनसंपर्काच्या कार्यात गती आणण्यात येत आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. सोबतच मीडियाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहचण्यात येत आहे. सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करण्यात येत आहे. सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेबसाईट अपडेट करण्यात येत आहे. यामुळे काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंग साईट्सवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयासोबत जुळलेल्यांची संख्या वाढली आहे. लोकराज्य या मासिकामुळेही प्रसारात वाढ झाली आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमnagpurनागपूर