शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

युपीतून उर्जा घेतलेले बावनकुळे महाराष्ट्र पिंजणार, कार्यकारी अध्यक्षांसाठी ‘बेस’ बनविणार

By योगेश पांडे | Updated: February 12, 2025 22:57 IST

यावेळी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हेदेखील सोबत राहणार असून दोघेही राज्यातील विविध मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीसह संवाद साधणार आहेत. दोघेही राज्यातील ४७ संघटनात्मक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकी व विभागीय कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.

नागपूर : उत्तर प्रदेशात विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन परतलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नव्या दमाने कामाला लागले आहे. भाजपाच्या 'संघटन पर्व' अभियानाच्या निमित्ताने चंद्रशेखर बावनकुळे हे १३,१४,१५ फेब्रुवारी असे तीन दिवसांच्या महाराष्ट्रात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हेदेखील सोबत राहणार असून दोघेही राज्यातील विविध मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीसह संवाद साधणार आहेत. दोघेही राज्यातील ४७ संघटनात्मक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकी व विभागीय कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.रवींद्र चव्हाण यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत बावनकुळे हे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी जाऊन आढावा घेणार आहेत. या निमित्ताने चव्हाण यांचा ‘बेस’देखील ते पक्का करण्यावर भर देणार आहेत. सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांनादेखील कामाला लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. १३ फेब्रुवारी रोजी अकोला येथे हॉटेल सिटी स्पोर्ट्स येथे सकाळी १० वाजता कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्याच दिवशी दुपारी ३ नागपूरच्या जगनाडे चौकातील हॉटेल रिजंटा येथे पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. सायंकाळी ७ वाजता पश्चिम नागपुरात कृष्ण ग्रीन लॉन कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी नांदेड, छत्रपती संभाजीनगर तर १५ फेब्रुवारी रोजी जळगाव, नाशिक येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा