शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

मुळात शिंदे सरकार बेकायदेशीर; संजय राऊत यांची नागपुरात टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2022 19:51 IST

Nagpur News मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे. १६ आमदारांवर अपात्रतेची तलवार असताना ते जर १९ तारखेला शपथ घेत असतील तर ते घटनाबाह्य आणि घटनाद्रोही आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली.

ठळक मुद्दे सोळा आमदारांवर अपात्रतेची तलवार कायम

नागपूर : मुळात राज्यात अद्याप सरकार अस्तित्वात आलेले नाही. गुरुवारी दोघांची कॅबिनेट झाली. अद्याप सरकारचा शपथविधी झाला नाही. मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे. १६ आमदारांवर अपात्रतेची तलवार असताना ते जर १९ तारखेला शपथ घेत असतील तर ते घटनाबाह्य आणि घटनाद्रोही आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली.

खासदार संजय राऊत यांचे गुरुवारी दुपारी नागपुरात आगमन झाले. विमानतळावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, ज्या पद्धतीने या सरकारचे काम चालू आहे, मागच्या सरकाने जनतेचे आणि राज्याचे हित पाहून घेतले होते; पण विरोधासाठी विरोध, या भूमिकेतून हे दोघांचं कॅबिनेट काम करत असेल, तर पाहू. दिवस बदलत जातात. भविष्यात सत्तांतर होत असते. त्यामुळे विरोधासाठी विरोध असे काम करू नये.

मी फडणवीस यांच्या शहरात आलोय. पक्षाच्या कामासाठी आलोय. सगळं जागच्या जागी आहे. माझं स्वागत करायला सगळे आलेत. हे चित्र महाराष्ट्रात दिसतेय.

- बंड हा भास आहे, शिवसेना अशा अनेक प्रसंगांतून बाहेर पडलीय. ५६ वर्षांत अनेक संकटं, वादळं आम्ही पाहिली आहेत. शिवसेना पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मला इथे पाठवले आहे. इथले कुणीही बाहेर गेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आ. जयस्वाल यांच्या रामटेकवर लक्ष

- शिंदे गटात सामील झालेले आमदार आशिष जयस्वाल यांच्या रामटेक मतदारसंघावर शिवसेनेने आतापासून फोकस केल्याचे दिसते आहे. संजय राऊत यांनीही गुरुवारी आपण नागपुरात रामटेक मतदारसंघातील शिवसैनिकांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेणार असल्याचे स्पष्ट केले. सोबतच आपल्या स्वागतासाठी रामटेकहून अनेक कार्यकर्ते आल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत