शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बंदिजन शेतकºयांनाही मिळणार कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:46 IST

मध्यवर्ती कारागृहातील शेतकरी असलेल्या बंदिजनांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी केलेल्या ....

ठळक मुद्दे१४ आॅनलाईन अर्ज : मध्यवर्ती कारागृहात जिल्हा प्रशासनातर्फे विशेष सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्यवर्ती कारागृहातील शेतकरी असलेल्या बंदिजनांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी केलेल्या विनंतीनुसार जेल प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून तसेच जिल्हा प्रशासनाने १४ बंदिजनांचे कर्जमाफी योजनेच्या लाभासाठी आॅनलाईन अर्ज भरुन घेतले आहेत. त्यामुळे शासनाच्या महत्त्वाकांक्षी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग बंदिजनांनाही सुलभ झाला आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकºयांना कर्जमाफी देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शासनाने घेतला असून या योजनेच्या लाभासाठी आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदिजनांनी मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांच्याकडे अर्ज केला होता. त्यांच्या विनंतीनुसार सामाजिक कार्यकर्ते गजनान इंगळे यांच्या साहाय्याने कर्जमाफीसाठी विनंती केलेल्या बंदिजनांकडून आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेल्या आधारकार्डासह इतर माहिती त्यांच्या नातेवाईकाकडून गोळा करण्यात आली.कर्जमाफी योजनेच्या लाभासाठी मध्यवर्ती कारागृहातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील बंदिजनांनी विनंती केली होती. त्यानुसार सामाजिक कार्यकर्ते गजानन इंगळे यांनी आधारकार्ड, तसेच इतर कागदपत्र गोळा करण्यासाठी बंदिजन व त्यांच्या नातेवाईकांकडे कारागृहाच्या वतीने संपर्क केला. त्यापैकी आधारकार्ड वरील बॉयोमेट्रिक नोंदणीनुसार पुष्टी करताना विसंगती तसेच काही बंदिजनांकडे आवश्यक दस्ताऐवज उपलब्ध झाले नाहीत. त्यापैकी १४ जणांचे आधार क्रमांकासह आॅनलाईन नोंदणीसाठी पात्रता योग्य असल्यामुळे त्यांची नोंदणी करण्यात आली.शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कृषी कर्जमाफीसाठी जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले असता जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी तहसीलदार तसेच आपले सरकार सेवाकेंद्राच्या चमूला मध्यवर्ती कारागृहामध्ये आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक बॉयोमेट्रिक यंत्रासह कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या बंदिजनांकडून आॅनलाईन अर्ज भरून घेण्यात आले. कर्जमाफीच्या नोंदणीनंतर युजर आयडी व पासवर्ड तयार झाल्यामुळे बंदिजनांच्या कुटुंबांनी आता त्यांच्या गावातील संग्राम केंद्रात अथवा आपले सरकार सेवाकेंद्रात जाऊन आॅनलाईन फार्म भरणे सुलभ झाले आहे.कर्जमाफीसाठी मिळण्यासाठी १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख असल्यामुळे बंदिजनांच्या कुटुंबांना त्यांच्या गावातील नोंदणी केंद्रामध्ये जाऊन कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठीसुध्दा मार्गदर्शन करण्यात आले आहे. आपले सरकार या सेवा केंद्राचे जिल्हा समन्वयक उमेश घुगुसकर, आनंद पटले यांनी आॅनलाईन नोंदणीची व्यवस्था केली. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ता गजानन इंगळे यांनी कर्जमाफीसाठी विनंती केलेल्या सर्व कैद्यांना भेटून त्यांचेकडून आवश्यक कागदपत्र गोळा करण्यासोबतच आधार नंबर घेण्यासाठी संबंधित बंदिजनांच्या गावी संपर्क करुन आधार क्रमांक मिळविले.कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी मध्यवर्ती कारागृहाचे उपअधीक्षक सुनील निघोट, वरिष्ठ तुरुंग अधिकारी गावित, मिराशे, पाटील गुरुजी, हतवादे गुरुजी तसेच सामाजिक कार्यकर्ता गजानान इंगळे यांनी विशेष सहकार्य केले.मध्यवर्ती कारागृह व जिल्हा प्रशासनाच्या सकारात्मक पुढाकाराने शेतकरी कर्जमाफी योजनेपासून शेतकरी वंचित राहणार नाही. या शासनाच्या भूमिकेनुसार बंदिजन असलेल्या शेतकºयांनाही कर्जमाफी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.