शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बार कौन्सिलचा गरजू वकिलांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 21:57 IST

लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या वकिलांना ‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवा’ने मदतीचा हात दिला आहे. कौन्सिलच्या वतीने गरजू वकिलांना एक महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंची किट वितरित केली जात आहे. आतापर्यंत ५० वकिलांना किट देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या वकिलांना ‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवा’ने मदतीचा हात दिला आहे. कौन्सिलच्या वतीने गरजू वकिलांना एक महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंची किट वितरित केली जात आहे. आतापर्यंत ५० वकिलांना किट देण्यात आली आहे.किटमध्ये दहा किलो कणिक, दोन किलो तांदूळ, दोन किलो साखर, दोन किलो तेल, रवा, पोहे, तिखट, मीठ, हळद इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच वकिलांचा व्यवसाय ठप्प आहे. त्यापैकी न्यायालयासह विविध ठिकाणी किरकोळ कामे करून पोटापुरते पैसे कमावणाऱ्या वकिलांवर आर्थिक संकट कोसळले आहे. कमाई बंद झाल्यामुळे कुटुंबाच्या पालनपोषणाचा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित झाला आहे. परिणामी, बार कौन्सिलने राज्यातील सर्व गरजू वकिलांना लॉकडाऊन संपेपर्यंत जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यात डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनच्या माध्यमातून गरजू वकिलांपर्यंत मदत पोहचवली जात आहे. त्याकरिता गरजू वकिलांना मदतीकरिता कौन्सिल किंवा असोसिएशनच्या कार्यालयात किंवा पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधायचा आहे. कौन्सिलचे सदस्य अ‍ॅड. अनिल गोवारदीपे यांनी ही माहिती दिली. कौन्सिलचे अन्य सदस्य अ‍ॅड.आसिफ कुरेशी, अ‍ॅड.पारिजात पांडे, डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. कमल सतुजा व महासचिव अ‍ॅड.नितीन देशमुख उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस