शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

बार कौन्सिलच्या निवडणुकीत नागपुरात ६७.१८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:25 IST

बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या निवडणुकीत नागपूरमध्ये ६७.१८ टक्के मतदान झाले. ६२८९ पैकी ४२२५ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान चालले. कौन्सिलच्या २५ जागांसाठी बुधवारी निवडणूक झाली.

ठळक मुद्दे१६४ उमेदवारांचे भविष्य पेटीबंद : नागपुरातील ९ उमेदवारांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या निवडणुकीत नागपूरमध्ये ६७.१८ टक्के मतदान झाले. ६२८९ पैकी ४२२५ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान चालले. कौन्सिलच्या २५ जागांसाठी बुधवारी निवडणूक झाली.नागपूरमध्ये जिल्हा व सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ या दोन ठिकाणी मतदान केंद्रे देण्यात आली होती. जिल्हा व सत्र न्यायालयात ५५०८ पैकी ३५८१ म्हणजे ६५.०१ टक्के तर, उच्च न्यायालयात ७८१ पैकी ६४४ म्हणजे ८२.४५ टक्के मतदारांनी मतदान केले. निवडणुकीत महाराष्ट्र व गोवा येथील तब्बल १६४ उमेदवार रिंगणात होते. त्यात नागपुरातील अ‍ॅड. किशोर लांबट, अ‍ॅड. अनिल गोवारदीपे, अ‍ॅड. आसिफ कुरैशी, अ‍ॅड. विकास सिरपूरकर, अ‍ॅड. ईश्वर चर्लेवार, अ‍ॅड. सुदीप जयस्वाल, अ‍ॅड. सुनील लाचरवार, अ‍ॅड. परिजात पांडे व अ‍ॅड. अनुपकुमार परिहार या नऊ उमेदवारांचा समावेश होता. या सर्वांचे भविष्य आता पेटीबंद झाले आहे. कौन्सिलच्या गेल्या सदस्यांचा कार्यकाळ जानेवारी-२०१५ मध्येच संपला आहे. परंतु, विविध कारणे व राजकीय डावपेचांमुळे ही निवडणूक आतापर्यंत लांबली.मतदारांची गैरसोयमतदान केंद्रे कमी असल्यामुळे वकिलांची मोठी गैरसोय झाली. त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तासंतास रांगेत उभे रहावे लागले. यासंदर्भात तक्रारी करूनही निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्य दखल घेतली नाही असे जिल्हा विधिज्ञ संघटनेचे सचिव नितीन तेलगोटे यांनी सांगितले.

टॅग्स :advocateवकिलElectionनिवडणूक