शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बँका आजपासून नियमित सुरू राहणार  : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 23:26 IST

लॉकडाऊनच्या या काळात कुणालाही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्व बँका व त्यांच्या सर्व शाखा नियमितपणे सुरू ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देबँक प्रतिनिधींची घेतली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या या काळात कुणालाही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्व बँका व त्यांच्या सर्व शाखा नियमितपणे सुरू ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. आज गुरुवारी सर्व बँकांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांनी हे आदेश दिले. त्यानुसार उद्या शुक्रवारपासून सर्व बँकांच्या सर्व शाखा नियमितपणे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये सुरू राहतील. ग्राहकांकरिता बँकेची वेळ सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंतची राहील.केंद्र सरकारच्या आदेशानुसार, महिलांच्या जनधन खात्यामध्ये प्रत्येकी ५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हे सानुग्रह अनुदान एप्रिल, मे व जून महिन्यात जमा होणार आहे. त्याप्रमाणे एप्रिल महिन्याचे पैसे सद्यस्थितीत जमा झालेले आहेत, त्यामुळे गर्दी होऊ नये. म्हणून बँकांच्या सर्व शाखा सुरू राहणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले. यासोबतच सर्व शाखांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळण्याकरिता ४-४ फुटांच्या अंतरावर सर्कल्स मार्किंग करावेत. त्यानुसार ग्राहकांना उभे राहण्यास सांगावे. ग्राहकांसाठी सॅनिटायझर, हॅण्डवॉश, साबण, पाणी इत्यादींची व्यवस्था बँकेतर्फे करावी. बँकेच्या दर्शनी भागावर कोरोना जनजागृती, उपाययोजनासंबंधीचे होर्डिंग्ज लावणे बंधनकारक राहील. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. गर्दी होऊ नये म्हणून मोठ्या बँकांनी नागरिकांना घरपोच रक्कम देण्याची व्यवस्था करावी, परंतु प्रतिनिधी निवडताना त्यास ताप, खोकला असू नये, तसेच ती व्यक्ती हॉटस्पॉटमधील नसावी, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

टॅग्स :bankबँकnagpurनागपूर