शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

आपले सरकार सेवा केंद्रात आता बँकिंग सुविधा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 20:44 IST

ग्रामस्थांना पैशाची गरज पडल्यास गावातून तालुक्यात जाणे टाळण्यासाठी सरकारने आपले सरकार सेवा केंद्रात बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेचा लाभ गावातील जनधन योजनेचे खातेदार, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी घेत आहे. सेतू केंद्रात जाऊन आपल्या बँक खात्यातील रक्कम काढत आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातील नागरिकांसाठी ठरतेय वरदान

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सरकारने अख्खा देश लॉकडाऊन केला आहे. प्रवासी वाहतुकीच्या सेवा ठप्प आहेत. दुचाकीवर बाहेर पडल्यास पोलिसांचे फटके खावे लागत आहेत. अशात ग्रामस्थांना पैशाची गरज पडल्यास गावातून तालुक्यात जाणे टाळण्यासाठी सरकारने आपले सरकार सेवा केंद्रात बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेचा लाभ गावातील जनधन योजनेचे खातेदार, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी घेत आहे. सेतू केंद्रात जाऊन आपल्या बँक खात्यातील रक्कम काढत आहे.लॉकडाऊनमुळे शहरासह ग्रामीण भागातील बँकांमध्ये नागरिकांची पैसे काढण्यासाठी गर्दी होत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. मात्र आपले सरकार सेवा केंद्रात सरकारच्या नियमांचे पालन करून गर्दी टाळण्यात येत आहे. शिवाय सोशल डिस्टंसिंगचे पालनही करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना बँकेतील रक्कम काढण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागते. परंतु आता लॉकडाऊनमुळे वाहने व इतर वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यात आल्याने हेही करणे शक्य नाही. त्यामुळे अशा ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या राहत्या गावीच ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्राचे संगणक परिचालक बँकिंग सुविधा देत, ग्रामस्थांना तेथेच पैसे उपलब्ध करून देत आहेत.नागपूर जिल्ह्याच्या तेरा तालुक्यांतर्गत एकूण ७६८ ग्रामपंचायती असून, १५ लाखावर नागरिक येथे वास्तव्यास आहेत. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली व आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक किशोर पठाडे यांच्या नेतृत्वात सुमारे ४०० वर ग्रा.पं.मध्ये नागरिकांना आपले सेवा केंद्रामार्फत डिजिपेच्या माध्यमातून बँकिंग सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.वीज बिलाचा भरणा व इतरही डिजिटल सेवा उपलब्धविशेष म्हणजे, अनेक केंद्रावर तर नागरिकांना बँकिंग सुविधेसोबत वीज बिलाचा भरणा व इतर डिजिटल सेवाही उपलब्ध करुन दिल्या जात आहे. नागपूर पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या दवलामेटी येथील आपले सरकार सेवा केंद्र चालक मोहन शेंदरे यांनी जनधन योजनेच्या लाभार्थ्यांना आजवर १ लाख ५७ हजारावरील रक्कम या केंद्रामार्फतच वितरित केली आहे. नागरिकांना घरच्या घरीच लॉकडाऊनच्या काळात पैसे उपलब्ध होत असल्याने त्यांच्याकडून याला पसंतीही दिली जात आहे.

टॅग्स :bankबँकGovernmentसरकार