शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बँकेच्या कर्मचाऱ्यांनीच केला अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 14:23 IST

कर्जधारकांकडून वसूल केलेली रक्कम बँकेत जमा न करता त्या रकमेचा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वत:च वापर केला. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बँकेत हा गैरप्रकार घडला.

ठळक मुद्देकर्जदारांकडून रक्कम वसूलस्वत:च केली खर्चमानकापुरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्जधारकांकडून वसूल केलेली रक्कम बँकेत जमा न करता त्या रकमेचा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वत:च वापर केला. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बँकेत हा गैरप्रकार घडला. तो लक्षात आल्यानंतर दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध मानकापूर पोलिसांनी सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.कोराडी मार्गावर एक खासगी बँक आहे. या बँकेचे व्यवस्थापक रोहित ओमप्रकाश सोनी (वय ३३) यांनी मानकापूर पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मनीष विठ्ठलराव बघेल (वय ३३) हा धनगवळीनगर, पिपळा रोड (राजापेठ) ला राहतो. तो बँकेने दिलेल्या कर्जदारांकडील सुलभ हप्ते (किस्त) गोळा करण्याचे काम करीत होता. त्याने ८ सप्टेंबर २०१६ ते आॅगस्ट २०१७ या कालावधीत कर्जदाराकडून १०,१९० रुपयांची रक्कम वसूल केली. मात्र, ही रक्कम बँकेत जमा न करता स्वत:च वापरली.अशाच प्रकारे राममोहन बैरंगी राव (वय २६, रा. गितानगर, झिंगाबाई टाकळी) याने ९ सप्टेंबर २०१६ ते १४ आॅगस्ट २०१७ या कालावधीत कर्जदारांकडून ६७,७८१ रुपये गोळा केले. मात्र ते बँकेत जमा न करता त्या रकमेचा अपहार केला. ही अफरातफर लक्षात आल्यानंतर बँकेतर्फे रोहित सोनी यांनी मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी करून सोमवारी बँकेचे दोषी कर्मचारी बघेल आणि राव या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.तक्रारीस विलंब का ?या फसवणूक प्रकरणातील रक्कम फार मोठी नाही. बँकेचा एकूणच व्याप लक्षात घेता अफरातफरीचा प्रकार जास्त वेळ दडून राहू शकत नाही. एजंटस्नी रक्कम हडपल्याची बाब आधीच उघड होऊनही गुन्हा दाखल करण्यास एवढा विलंब का झाला, ते कळायला मार्ग नाही.

टॅग्स :Crimeगुन्हा