शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बँकेचे संचालकपद ८ वर्षांसाठीच; बँकिंग नियमन सुधारणा कायदा 

By मोरेश्वर मानापुरे | Updated: June 5, 2023 19:05 IST

Nagpur News सहकारी बँकांमधील संचालकांना ८ वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर राहता येणार नाही, अशी तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली असून सहकारी बँकांमधील ८ वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर असलेल्या संचालकांची माहिती मागविली आहे.

मोरेश्वर मानापुरे  नागपूर :  पंजाब आणि महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर २० जून २०२२ पासून बँकिंग नियमन सुधारणा कायदा लागू झाला. सहकारी बँकांमधील संचालकांना ८ वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर राहता येणार नाही, अशी तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली असून सहकारी बँकांमधील ८ वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर असलेल्या संचालकांची माहिती मागविली आहे. यामुळे सहकारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

हा कायदा लागू झाल्यामुळे नागरी सहकारी बँकांच्या नियमांमध्ये अनेक बदल झाले आहेत. कायद्यात दुरुस्ती करताना सहकारी बँकेच्या संचालकाला दोन टर्नपेक्षा जास्त काळ पदावर राहता येत नाही. याकरिता ८ वर्षांचा कार्यकाळ नमूद करण्यात आला आहे. पण सहकारी क्षेत्रात एक टर्न पाच वर्षांची अर्थात दोन टर्न दहा वर्षांची आहे. नवीन कायद्यात दोन टर्न संचालक पदावर राहिल्यानंतर एक टर्न गॅप देऊन संचालक पुन्हा दोन टर्न पदावर राहू शकतो, अशी तरतूद आहे. त्यामुळे आठ वर्षांच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह आहे. कायद्यात आणखी सुधारणा होऊन संचालकांसाठी आठऐवजी दहा वर्षांचा कार्यकाळ होऊ शकतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. 

तरुणांना मिळेल काम करण्याची संधीसध्या सहकार क्षेत्रात नवीन जोमाचे तरुण येत नाही. त्यांना या क्षेत्राचे ज्ञान नाही, असे नाही, तर त्यांना २५ वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर राहिलेले लोक या क्षेत्रात येऊच देत नाहीत. पण बँकिंग नियमन सुधारणा कायद्यामुळे तरुणांना सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. तर दुसरीकडे सहकार क्षेत्रात अनुभवी लोकांची पोकळी निर्माण होईल आणि कामावर परिणाम होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. रिझर्व्ह बँकेने या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू केल्यास सहकारी बँकांचे अनेक पदाधिकारी आणि संचालकांना खुर्ची खाली करावी लागेल. त्यामुळे बहुतांश बँकांमधील संचालकाची पदे रिक्त होतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

तरुणांना सहकार क्षेत्रात कामाची संधी मिळावी यासाठी सहकारी बँकांच्या संचालकपदी जास्तीत जास्त दोन वेळा किंवा आठ वर्षांपेक्षा जास्त काळ राहता येणार नाही. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. निकालासाठी काही वर्ष वाट पाहावी लागेल. सतीश मराठे, संचालक, रिझर्व्ह बँक.

संचालकांच्या दोन टर्न ही अतिशय चांगली बाब आहे. यामुळे तरुणांना सहकार क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन आणि संधी मिळेल. सध्या रिझर्व्ह बँकेने माहिती मागविली आहे. कायद्यानुसार एक टर्नची गॅप राहून संचालक पुन्हा दोन टर्न पदावर राहू शकतो.विवेक जुगादे, सहकार भारती.

टॅग्स :bankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र