शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात एटीएममध्ये ठणठणाट : बँकांना आठवड्यात चार दिवस सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:32 IST

चालू सप्ताहात शुक्रवार वगळता बँकांना चार दिवस सुट्या असल्यामुळे एटीएममध्ये ठणठणाट असून नागरिकांना आर्थिक टंचाई जाणवत आहे.

ठळक मुद्देनागरिकांची गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चालू सप्ताहात शुक्रवार वगळता बँकांना चार दिवस सुट्या असल्यामुळे एटीएममध्ये ठणठणाट असून नागरिकांना आर्थिक टंचाई जाणवत आहे.बुधवारी लक्ष्मीपूजन आणि गुरुवारी भाऊबीजमुळे बँकांना सुटी होती. शुक्रवारी बँकांचे कामकाज झाले. त्यानंतर दुसरा शनिवार आणि रविवारमुळे बँका बंद होत्या. अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सुटी घेऊन सलग पाच दिवस आनंद घेतला. सर्वच बँकांनी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर करन्सी चेस्टला एटीएममध्ये दोन दिवसांची रक्कम टाकण्यास सांगितले होते. पण बुधवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनेकांनी आपली आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी एटीएमकडे धाव घेतल्यामुळे अनेक बँकांच्या एटीएममधील रक्कम बुधवारी दुपारीच संपली. त्याचा फटका दिवाळी साजरी करणाऱ्यांना झाला. याशिवाय शनिवारीही सर्वच राष्ट्रीयकृत बँकांच्या अर्ध्यांपेक्षा जास्त एटीएमध्ये ठणठणाट होता. सोमवारी सकाळी बँकेकडून रक्कम आल्यानंतरच एटीएम सुरू होईल, असे सुरक्षा रक्षक सांगत होते.सदर प्रतिनिधीने सीताबर्डी, धंतोली, रेशीमबाग, नंदनवन, सक्करदरा या भागातील एटीएमची पाहणी केली असता बºयाच एटीएम बाहेर ‘नो कॅश’चे बोर्ड झळकत होते. अनेक बँकांच्या एटीएमध्ये शुक्रवारी रक्कम पोहोचली नाही. काही एटीएममध्ये रक्कम होती. मात्र, त्यात दुसऱ्या बँकांचे कार्ड स्वीकारले जात नसल्यामुळे अनेकांची गैरसोय झाली. बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना ‘रिकाम्या एटीएम’चा मोठा फटका बसला. गड्डीगोदाम चौक, कडबी चौक, जरीपटका, सीताबर्डीसह अनेक भागातील एटीएमसमोर गर्दी होती.

 

टॅग्स :atmएटीएमnagpurनागपूर