शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नवनव्या कंपन्या स्थापन करून फसवित होता बंजारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 21:02 IST

टॅक्सी मालकांना लाखो रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या सुभाष बंजारा नवनव्या कंपन्या स्थापन करून नागरिकांना फसवित होता. अनेक काळापासून त्याचा गोरखधंदा सुरू असल्यामुळे तो फसवणूक करण्यात पटाईत होता. नागपुरात त्याने ४३५ टॅक्सी मालकांना फसविल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे४८ तासानंतरही सुगावा नाही : ४३५ टॅक्सी मालक झाले शिकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टॅक्सी मालकांना लाखो रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या सुभाष बंजारा नवनव्या कंपन्या स्थापन करून नागरिकांना फसवित होता. अनेक काळापासून त्याचा गोरखधंदा सुरू असल्यामुळे तो फसवणूक करण्यात पटाईत होता. नागपुरात त्याने ४३५ टॅक्सी मालकांना फसविल्याची माहिती आहे. गुन्हा दाखल होऊन ४८ तास उलटल्यानंतरही बंजाराचा काहीच सुगावा लागला नाही. परंतु त्याचे कुटुंबीयांना तो कुठे गेला याची माहिती आहे.बंजारा आठवडाभरापूर्वी एलआयसी चौकातील गिरीश हाईट्समधील टॅक्सी ट्रॅव्हल कंपनी बंद करून पसार झाला आहे. त्याने जून महिन्यामध्ये फसवणुकीचा व्यवसाय सुरु केला होता. बंजारा टॅक्सी मालकांना एक रुपये प्रती किलोमीटरच्या भावाने पैसे देत होता. त्यामुळे ई-पास घेऊन ये-जा करणाऱ्यांची बंजाराकडे गर्दी झाली होती. जुलै महिन्यात ४० ते ५० टॅक्सीच्या आधारे बंजाराचा व्यवसाय सुरू होता. बंजाराने टॅक्सी मालकांना ऑगस्ट महिन्याच्या किरायाचे धनादेश दिले. त्याने धनादेश देतानाचे फोटो काढले. हे फोटो टॅक्सी मालकांच्या ग्रुपवर व्हायरल केले. बंजारातर्फे वेळेवर पैसे मिळत असल्यामुळे टॅक्सी मालकांना त्याच्यावर विश्वास पटला. ते बंजाराकडे आकर्षित झाले. बंजारा एका टॅक्सीवर शहरात संचालनासाठी ५५०० रुपये तसेच बाहेर संचालनासाठी १७५०० रुपये रजिस्ट्रेशन शुल्क घेत होता. त्याच्या जवळ शहरासाठी १५० तसेच बाहेरच्यासाठी २८५ टॅक्सींची नोंदणी झाली होती. त्यांच्याकडून ५८ लाख रुपये नोंदणी शुल्काच्या माध्यमातून मिळाल्याची माहिती आहे. क्षमतेपेक्षा अधिक टॅक्सी किरायाने घेतल्यामुळे बंजाराचा व्यवसाय बुडित निघाला. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी इशारा देऊन त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला. बंजारा ठरलेल्या योजनेनुसार रजिस्ट्रेशनची रक्कम घेऊन पसार होणार होता. त्याच्याशी निगडित व्यक्ती यापासून अनभिज्ञ होत्या. आता त्यांना बंजाराच्या खऱ्या योजनेची माहिती मिळत आहे.पत्नीही झाली सोबत फरारबंजाराच्या व्यवसायात त्याची पत्नी रश्मी ही सुद्धा सहभागी आहे. त्याला सहा महिन्याची मुलगी आहे. तिलाही ते सोबत घेऊन गेले आहेत. त्याचा मुलगा आजी-आजोबा व मामा सोबत बंजाराच्या कळमना येथील किरायाच्या घरात राहतात. किरायाचे घर पाहून टॅक्सी मालकांना बंजारावर शंकाही आली. परंतु तो कळमनात बंगल्याचे काम सुरू असल्याचे सांगून त्यांना शांत करीत होता.

टॅग्स :fraudधोकेबाजीTaxiटॅक्सी