शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा भरपावसात वाजणार बॅण्डबाजा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 10:10 IST

मुहूर्त पाहून लग्न करणाऱ्यांसाठी या सपंूर्ण वर्षात १८ जूनपासून केवळ २४ शुभ मुहूर्त आहेत.

ठळक मुद्देलग्नाचे जूनमध्ये ९ तर जुलैमध्ये १२ मुहूर्त २३ जुलैपासून देवशयनी एकादशी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अधिकमास संपल्यानंतर लग्न मुहूर्ताला सुरुवात झाली आहे. १४ व १५ जून रोजी मध्यम मुहूर्तानंतर १८ जूनपासून शुभ मुहूर्ताला सुरुवात झाल्याने लग्न समारंभाला सुरुवात झाली आहे. २० जुलैपर्यंत विवाह समारंभ होतील. २३ जुलैला देवशयनी एकादशी आहे. तेव्हापासून नोव्हेंबरपर्यंत मंगल कार्य करता येणार नाही. डिसेंबरमध्ये केवळ तीनच शुभ मुहूर्त आहेत. मुहूर्त पाहून लग्न करणाऱ्यांसाठी या सपंूर्ण वर्षात १८ जूनपासून केवळ २४ शुभ मुहूर्त आहेत.याबाबत पं. उमेश तिवारी यांनी सांगितले की, अधिकमासात वैवाहिक कार्य होत नाही. त्यामुळे ते संपल्याने पुन्हा मंगल कार्याला सुरुवात झाली आहे. यावर्षी मुहूर्त कमी आहे. त्यामुळे मंगल कार्य करणाऱ्या इच्छुकांना तिथीची निवड करण्यास खूप त्रास होत आहे. वर्षाच्या शेवटपर्यंत केवळ २४ मुहूर्त आहेत.

या तिथीमध्ये विवाह योगजून महिन्यात १८, १९, २०, २१, २३, २५, २७, २९ आणि ३० तारखेला विवाहाचे मुहूर्त आहे. यानंतर जुलैमध्ये ४, ५, ६, ९, १०, ११ आणि १५ तारखेचे मुहूर्त सर्वोत्तम आहेत. तर याच महिन्यात १६, १७, १८, १९ आणि २० जुलैला मध्यम मुहूर्त आहेत.

फेब्रुवारी २०१९ मध्ये २८ दिवसात १६ मुहूर्त२०१९ मध्ये जानेवारी ते मार्चपर्यंत एकूण ३४ शुभ मुहूर्त आहेत. जानेवारीमध्ये ११ मुहूर्त आहेत. तर फेब्रुवारी महिन्यात १६ आणि मार्चमध्ये केवळ ७ मुहूर्त आहेत. यात जानेवारी महिन्यात १७, १८, २२, २३, २४, २५, २६, २७, २९, ३० आणि ३१ तारीख शुभ आहे. फेब्रुवारी महिन्यात २८ दिवसात १६ मुहूर्त आहेत. १, २, ३, ८, ९, १०, १३, १४, १५, १९, २१, २२, २३, २४, २५ आणि २८ फेब्रुवारी रोजी मंगल कार्य केले जाऊ शकते. मार्चमध्ये २, ७, ८, ९, १२, १३ आणि १४ तारीख शुभ आहे.

तारा अस्त आणि पौष माहदेवउठनी एकदशी १९ नोव्हेंबरला आहे. परंतु तारा अस्त होत असल्याुळे यानंतर लगेच कुठलाही मुहूर्त नाही. ज्योतिषांच्यानुसार विवाह मुहूर्त शोधत असताना त्रिबल शुद्धीसह गुरु-शुक्रास्त यांचाही विचार करणे आवश्यक असते. या दोन्ही ग्रहांचा अस्त होणे दाम्पत्यांसाठी नुकसानकारक मानले गेले आहे.विवाह मुहूर्त काढताना जर गुरू व शुक्र अस्त प्रारुपमध्ये असतील तर विवाह शुभ मानला जात नाही. गुरू व शुक्राच्या उदयानंतर डिसेंबर २०१८ मध्ये शुभ मुहूर्त राहील. त्याचप्रकारे १६ डिसेंबरनंतर पौष मास सुरू होईल. यातही मंगल कार्य होणार नाही. जानेवारी २०१९ मध्ये विवाह योग आहे. यानंतर १५ मार्च २०१९ पासून मीन राशीचे सूर्य असल्याने खरमासमध्ये मुहूर्त नाहीत. १४ एप्रिलपर्यंत वैवाहिक कार्य होणार नाही.

टॅग्स :marriageलग्न