शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

गांधींच्या स्वप्नातील खरा नागरिक म्हणजे बाळासाहेब  : लीलाताई चितळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 00:42 IST

महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या बाळासाहेबांनी, त्या विचारांना सार्वजनिक जीवनातही अंतर्भूत केले. आयुष्यभर ते तसेच वागले. खऱ्या अर्थाने ते महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील नागरिकाप्रमाणे वागल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या लीलाताई चितळे यांनी केले.

ठळक मुद्दे बाळासाहेब सरोदे यांना आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या बाळासाहेबांनी, त्या विचारांना सार्वजनिक जीवनातही अंतर्भूत केले. आयुष्यभर ते तसेच वागले. खऱ्या अर्थाने ते महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील नागरिकाप्रमाणे वागल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या लीलाताई चितळे यांनी केले.विनोबा विचार केंद्राच्या सर्वोदय आश्रमात शुक्रवारी ज्येष्ठ गांधीवादी विचारक डॉ. बाळासाहेब सरोदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी, सर्वोदयी चळवळीशी निगडित सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षस्थानी गिरीश गांधी होते. तर लीलाताई चितळे, गांधीवादी विचारक मा.म. गडकरी, सर्वोदय आश्रमचे अध्यक्ष सुरेश पांढरीपांडे व्यासपीठावर उपस्थित होते.प्रत्यक्ष कार्यात असलेला माणूस अचानक गेला की त्याच्या वेदना तीव्र असतात. बाळासाहेबांचे कुटुंब हे अस्सल गांधीवादी आहे. हयात असताना अनेकजण माणसाचे दुर्गुण शोधत असतात आणि मृत्यूनंतर त्याच्या गुणांवर चर्चा केली जाते. बाळासाहेबांच्या हयातीतही त्यांच्या सद्गुणांवरच बोलले जात होते. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी केलेल्या कार्याचा आता उजाळा होण्यास सुरुवात होईल, असे मा.म. गडकरी यावेळी म्हणाले. देवाने दिलेले आयुष्य ध्येयनिष्ठा आणि चैतन्याने भारून निघावे, असे आयुष्य बाळासाहेब जगले. वर्तमानात सुरू असलेल्या जेएनयु, जामिया विद्यापीठ प्रकरणांच्या काळात गांधी, विनोबा आणि बाळासाहेबांच्या विचारांची गरज असल्याचे सुरेश पांढरीपांडे यावेळी म्हणाले. रचनात्मक कार्य आणि मानव धर्म पाळणाऱ्या बाळासाहेबांनी कृतिशील सज्जनांची सांगड घातली होती. निष्क्रिय सज्जनांच्या काळात त्यांचे हे कार्य अतिशय महत्त्वाचे असल्याची भावना गिरीश गांधी यांनी अध्यक्षस्थानाहून व्यक्त केली. यावेळी बाळासाहेबांचे बालमित्र रामदास केवटे, अरुण कोठारी, डॉ. पराग चौधरी, रवी गुडधे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. सामूहिक प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप झाला. संचालन रवींद्र भुसारी यांनी केले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी