शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  बजरंग दलाकडून 'व्हॅलेंटाईन'ला विरोध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 22:29 IST

व्हॅलेन्टाईन डे’ला विरोध करण्यासाठी विश्व हिंदू परिषद -बजरंग दलाकडून शुक्रवारी दुपारी तेलंगखेडी ते फुटाळा तलाव अशी रॅली काढण्यात आली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : व्हॅलेन्टाईन डे’ला विरोध करण्यासाठी विश्व हिंदू परिषद -बजरंग दलाकडून शुक्रवारी दुपारी तेलंगखेडी ते फुटाळा तलाव अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीत बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली बिभत्सपणा किंवा अश्लिलता दिसून आली तर ते सहन करणार नाही, असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आला.दरवर्षीप्रमाणे यंदादेखील बजरंग दलातर्फे ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या विरोधात रॅली काढण्यात आली. दुपारी ४ च्या सुमारास तेलंगखेडी बगिच्याजवळून रॅलीला सुरुवात झाली. सर्व कार्यकर्ते निदर्शने करत पायीच फुटाळा तलावापर्यंत पोहोचले. तेथेदेखील ‘व्हॅलेंटाईन डे’ विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी ‘टेडीबिअर’देखील जाळले.या रॅलीच्या वेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या विरोधात घोषणाबाजी केली. आम्ही प्रेमाचा विरोध करत नाही. मात्र ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या नावाखाली अश्लिलतेचा प्रसार होत आहे. या पाश्चिमात्य संस्कृतीचा विरोध करण्यासाठीच आम्ही ही भुमिका घेतली आहे, अशी माहिती बजरंग दलाचे शहर सहसंयोजक विशाल पुंज यांनी दिली.यंदा संयमित आंदोलनबजरंग दलाकडून दरवर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पूर्वसंध्येला इशारा रॅली काढण्यात येते. यावर्षी मात्र असा प्रकार झाला नाही. शिवाय मोटारसायकलवर रॅली न काढता कार्यकर्त्यांनी चालतच निदर्शने केली. विरोध प्रदर्शन झाल्यानंतर पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजलीदेखील अर्पण करण्यात आली.राष्ट्रीय बजरंगदलाकडूनदेखील विरोध प्रदर्शनदरम्यान डॉ.प्रवीण तोगडिया यांच्या मार्गदर्शनात स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय बजरंग दलातर्फेदेखील ‘व्हॅलेंटाईन डे’चा विरोध करण्यात आला. दुपारी चारच्या सुमारास संविधान चौक येथे कार्यकर्त्यांनी विरोध प्रदर्शन केले. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली सुरू असलेले पाश्चिमात्यकरण व अश्लिलता याविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत मंत्री किशोर दिकोंडवार, राष्ट्रीय बजरंग दलाचे शहराअध्यक्ष यजेंद्रसिंह ठाकूर, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे शहराअध्यक्ष वैभव कपूर, सहमंत्री प्रसाद काठीकर, पूर्व नागपूर महामंत्री अक्षय मुद्देमवर, राजेश शुक्ला प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी मागील वर्षी पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजलीदेखील अर्पण करण्यात आली.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डे