शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 21:56 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील शिक्षकांच्या पदोन्नती व थकीत वेतनासंदर्भातील प्रकरणात ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता व सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट बजावून येत्या ५ मार्च रोजी न्यायालयात हजर होण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देशिक्षक पदोन्नती व थकीत वेतन प्रकरण

आॅनलाईन लोकमतनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील शिक्षकांच्या पदोन्नती व थकीत वेतनासंदर्भातील प्रकरणात ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता व सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट बजावून येत्या ५ मार्च रोजी न्यायालयात हजर होण्याचा आदेश दिला.आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती व प्रोत्साहन भत्ता देण्याचा शासन निर्णय आहे. त्याचा लाभ मिळण्यासाठी यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दोन महिन्यांत एकस्तर पदोन्नतीचा लाभ व तीन महिन्यांत थकीत वेतन देण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे शिक्षकांनी अवमानना याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने दोन्ही अधिकाऱ्यांना मंगळवारी न्यायालयात उपस्थित होण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी आदेशाचे पालन केले नाही. परिणामी त्यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अमोल चाकोतकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर