लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुंतवणूकदाराची ७२ लाख ८० हजार रुपयांनी फसवणूक करणारा आरोपी रमेश पुंड याचा अटकपूर्व जामीन रद्द केला. तसेच, त्याला तात्काळ अटक करण्याचा पोलिसांना आदेश दिला.पुंड हा जागृती जनसेवा नागरी सहकारी पतसंस्थेचा पदाधिकारी आहे. त्याने उच्च न्यायालयात ९ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्याला १८ मार्च रोजी अटकपूर्व जामीन देण्यात आला होता. त्यानंतर त्याने चार लाख रुपयांचा धनादेश जमा केला होता. तो धनादेश बाऊन्स झाला. तसेच, त्याने उर्वरित रक्कमही जमा केली नाही. तक्रारकर्ते गुंतवणूकदार राजेश नगरधने यांनी सदर रक्कम काढण्यासाठी अर्ज केला असता पुंडने रक्कम दिली नसल्याची बाब पुढे आली. परिणामी, नगरधने यांनी पुंडवर अवमानना कारवाई करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावरील सुनावणीदरम्यान, न्यायालयाने अटकपूर्व जामीन रद्द करून पुंडला दणका दिला. तसेच, अवमानना अर्जावर २८ सप्टेंबर रोजी सुनावणी निश्चित केली. पुंडविरुद्ध कोतवाली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. सरकारतर्फे अॅड. भगवान लोणारे तर, तक्रारकर्त्यातर्फे अॅड. मो. अतिक यांनी कामकाज पाहिले.
गुंतवणूकदारांना ७३ लाखांनी फसवणाऱ्या आरोपीचा जामीन रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 22:21 IST
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुंतवणूकदाराची ७२ लाख ८० हजार रुपयांनी फसवणूक करणारा आरोपी रमेश पुंड याचा अटकपूर्व जामीन रद्द केला. तसेच, त्याला तात्काळ अटक करण्याचा पोलिसांना आदेश दिला.
गुंतवणूकदारांना ७३ लाखांनी फसवणाऱ्या आरोपीचा जामीन रद्द
ठळक मुद्दे हायकोर्ट : तात्काळ अटक करण्याचा आदेश