शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पार्श्वगायक स्वप्निल बांदोडकरचे मोबाईल लंपास

By admin | Updated: February 21, 2017 02:07 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा पार्श्वगायक स्वप्नील बांदोडकर याचे दोन महागडे मोबाईल लंपास करून ....

अनेकांसमोर चोरी : कार्यक्रमाचा बिघडला सूर नरेश डोंगरे नागपूरमराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा पार्श्वगायक स्वप्नील बांदोडकर याचे दोन महागडे मोबाईल लंपास करून चोरट्याने त्याचे सूर बिघडवले. रविवारी रात्री ९ च्या सुमारास एका कार्यक्रमादरम्यान ही घटना घडल्यानंतर स्वप्नीलसोबतच आयोजकांचाही मूड गेला. राधा ही बावरी... हरीची ..... या गीतामुळे प्रचंड लोकप्रियता मिळालेल्या स्वप्नीलचा रविवारी रात्री व्हीएनआयटीच्या सभागृहात कार्यक्रम होता. रसिकांची प्रचंड गर्दी पाहून स्वप्नीलही उत्साहित झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभीच त्याने रसाळ सुरांची उधळण करीत प्रेक्षकांकडून प्रचंड दाद घेतली. कार्यक्रम रंगात आला. गाणे सुरू असल्यामुळे स्वप्नीलने त्याचा आयफोन-७ आणि सॅमसंग गॅलक्सी हे दोन मोबाईल ‘फोन स्टॅण्ड’वर ठेवले. शब्दरचना बघण्यासाठी त्याने हे मोबाईल स्टॅण्डवर ठेवले होते. गाणे संपताच मंचाच्या बाजूला असलेल्या मदतनिसाने हे स्टॅण्ड उचलून बाजूला ठेवले. काही वेळेनंतर स्वप्नील तेथे पोहचला तेव्हा स्टॅण्डवर दोन्ही मोबाईल नव्हते. त्याने आजूबाजूच्यांना विचारणा केली. कुणीच मोबाईलबद्दल बोलेना. त्यामुळे कावराबावरा झालेल्या स्वप्नीलने आयोजकांच्या कानावर माहिती घातली. स्वप्नीलचे महागडे मोबाईल लंपास केल्याची कुजबूज सभागृहात वाढली. त्यामुळे रंगतदार कार्यक्रमाचा नूर पालटला. स्वप्नीलचा मूड गेला अन् आयोजकांच्या उत्साहावरही विरजण पडले. शेकडो रसिक आजूबाजूला असताना चोरट्यांनी फोन चोरण्याचा निर्ढावलेपणा दाखवल्याने स्वप्नीलसह साऱ्यांनाच धक्का बसला आहे. दरम्यान, दोन्ही फोन चोरीला गेल्यामुळे कुणाशी आणि कसा संपर्क करावा, असा प्रश्न स्वप्नीलसमोर होता. आयोजकांच्या माध्यमातून स्थानिक मित्रांशी कसाबसा संपर्क साधला. त्यानंतर रविवारी रात्री १० च्या सुमारास स्वप्नील बजाजनगर ठाण्यात पोहचला. तेथे त्याने मोबाईल फोन चोरीला गेल्याबाबतचा तक्रारअर्ज दिला. दरम्यान, एका मित्राच्या माध्यमातून गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडेही ही माहिती पोहचली. त्यांनी त्याची लगेच दखल घेत सायबर शाखेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती काढणे सुरू केले.(प्रतिनिधी) दोन मोबाईल दोन दिशेला सायबर शाखेने मोबाईल फोन ट्रॅकिंग सिस्टटमवर टाकले असता एक फोन राजनगरात तर दुसरा फोन सीताबर्डीच्या इलेक्ट्रॉनिक मार्केट परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. अर्थात, हे फोन चोरणारे आरोपी दोन किंवा दोनपेक्षा जास्त असल्याचा अंदाज त्यातून काढण्यात आला असून, घटनेच्या वेळी स्टेजजवळ घुटमळणाऱ्यांपैकीच कुणी ते लंपास केल्याचा कयास पोलिसांनी बांधला. त्या दृष्टीने फोन चोरणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, चोरीला गेलेल्या फोनची किंमत दीड लाख रुपये असल्याची माहिती स्वप्नील बांदोडकरने प्रस्तुत प्रतिनिधीसोबत बोलताना दिली.