शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

परत ‘येरे माझ्या मागल्या’

By admin | Updated: June 22, 2015 02:44 IST

एकेकाळी ज्या अभियांत्रिकी शाखेवर विद्यार्थ्यांच्या अक्षरश: उड्या पडत होत्या तेथे जागा भरण्यासाठी कसरतच करावी लागत आहे.

अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया :  केवळ ७० टक्के अर्जच दाखलनागपूर : एकेकाळी ज्या अभियांत्रिकी शाखेवर विद्यार्थ्यांच्या अक्षरश: उड्या पडत होत्या तेथे जागा भरण्यासाठी कसरतच करावी लागत आहे. यंदाच्या प्रवेशप्रक्रियेत उपलब्ध जागांच्या केवळ ७० टक्के अर्ज आल्यामुळे यंदा रिक्त जागांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे ‘आॅनलाईन’ अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत वाढ न केल्यामुळे महाविद्यालयांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्या गेले आहे. रविवारी अभियांत्रिकी शाखेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. नागपूर विभागातील ५७ महाविद्यालयांमध्ये २४ हजार ९९२ जागा आहेत. यंदा १८ हजार ५२८ ‘अप्लिकेशन किट’ विकल्या गेल्या होत्या. यापैकी केवळ १७ हजार ४४० म्हणजेच केवळ ६९.७८ टक्के विद्यार्थ्यांनीच अर्ज दाखल करुन अर्ज निश्चिती केली आहे. यातीलही अनेक विद्यार्थी इतर विभागांतील महाविद्यालयांत किंवा इतर अभ्यासक्रमात प्रवेश घेतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जागा शिल्लक राहण्याचा धोका आहे. (प्रतिनिधी)जागा भरण्यासाठी कसरतकमी प्रमाणात अर्ज दाखल झाल्यामुळे सगळ्यात मोठा दबाव महाविद्यालय प्रशासनावर आला आहे. अगोदरच अभियांत्रिकीची कमी होत असलेली ‘क्रेझ’, त्यातच दरवर्षी रिक्त जागांची वाढणारी संख्या व चढाओढीची स्पर्धा यातून महाविद्यालयांना जागा भरण्यासाठी अक्षरश: कसरत करावी लागणार आहे. नागपूर विभागात गेल्यावर्षी ११ हजार ८३१ जागा रिकाम्या राहिल्या होत्या. त्यामुळे यंदा विद्यार्थी आपल्याकडे यावे यासाठी महाविद्यालयांचे निरनिराळ्या तऱ्हेने प्रयत्न सुरू आहेत.व्यवस्थापन कोट्यावर भिस्तमागील काही वर्षांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची क्रेझ कमी झाली आहे. विभागातील काही मोजक्या महाविद्यालयांनाच विद्यार्थ्यांकडून प्रवेशाकरिता पसंती देण्यात येते. इतर महाविद्यालयांना प्रवेश मिळविण्यासाठी कसरतच करावी लागते. त्यामुळे बहुतांश महाविद्यालयांनी व्यवस्थापन कोट्यातून शक्य तितक्या जागा भरण्यावरच भर ठेवला आहे.