शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

कोट्यवधींच्या कंत्राटाकडे पाठ?

By admin | Updated: October 20, 2016 03:13 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांशी संबंधित कामांसाठी प्रशासनाकडून कोट्यवधींचे कंत्राट देण्यात येणार आहे.

नागपूर विद्यापीठ : तिसऱ्यांदा राबविण्यात येतेय निविदा प्रक्रियानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांशी संबंधित कामांसाठी प्रशासनाकडून कोट्यवधींचे कंत्राट देण्यात येणार आहे. मात्र या कंत्राटाकडे कंपन्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. शासकीय नियमांनुसार पुरेशा संख्येत कंपन्यांचे अर्ज न आल्यामुळे सलग दुसऱ्यांदा फेरनिविदा मागविण्यात आल्या आहेत. कोट्यवधींच्या कंत्राटाशी संबंधित निविदांमधील मोठ्या त्रुटी ‘लोकमत’ने समोर आणल्या होत्या हे विशेष.नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली बऱ्याच अंशी ‘आॅनलाईन’ झाली आहे. ‘एमकेसीएल’ला परीक्षा प्रणालीतून दूर केल्यानंतर विद्यापीठाला सक्षम कंपनीचा शोध आहे. त्यातच यंदापासून पदवी परीक्षादेखील सत्र प्रणालीनुसार राबविण्यात येत असल्यामुळे लवकरात लवकर परीक्षांच्या कामांचे कंत्राट देणे आवश्यक झाले आहे. नवीन शैक्षणिक सत्रापासून परीक्षेचे काम दोन किंवा त्याहून अधिक कंपनी किंवा संस्थांना देण्यात येईल, असे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार विद्यापीठाकडून ‘महाटेंडर्स’ या संकेतस्थळावर नोटीस जारी करण्यात आली व ८ जून ते १० जुलै या कालावधीत इच्छुक कंपन्यांकडून ‘ई’ निविदा मागविण्यात आल्या. मात्र विद्यापीठाने या निविदांची स्वत:च्या संकेतस्थळावरदेखील माहिती दिली नव्हती. शिवाय नागपूरबाहेरील कंपन्या यात अर्जच करू शकणार नाही, अशी अट टाकली होती. त्यामुळे केवळ दोन कंपन्यांच्या निविदा आल्या होत्या. ‘लोकमत’ने ही बाब उघडकीस आणल्यानंतर विद्यापीठाने फेरनिविदा मागविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र फेरनिविदा प्रक्रियेतदेखील केवळ दोन कंपन्यांचेच अर्ज आले. शासकीय नियमांनुसार तीन कंपन्यांचे अर्ज तरी येणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यापीठाने दुसऱ्यांदा फेरनिविदा प्रक्रिया राबवली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.(प्रतिनिधी)लवकरच निविदा उघडणारयासंदर्भात परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांना विचारणा केली असता त्यांनी परीक्षेच्या कामामुळे निविदा अद्याप उघडण्यात आल्या नसल्याचे स्पष्ट केले. ही निविदा प्रक्रिया शासकीय नियमांनुसार राबविण्यात आली आहे. सध्या परीक्षा विभागावर परीक्षेचा ताण आहे. साधारणत: ८ ते १० दिवसांत फेरनिविदा उघडण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.