शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोटावर चटके दिलेले बाळ सुखरुप ; प्रशासनासह डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे बाळाला मिळाले नवे आयुष्य

By सुमेध वाघमार | Updated: March 28, 2025 19:08 IST

Nagpur : हृदयावरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया झाली यशस्वी

सुमेध वाघमारे नागपूर : चिखलदरा तालुक्यातील सिमोरी येथील राजू व फुलवंती धिकार या दाम्पत्याच्या २२ दिवसांच्या बाळाच्या पोटावर चटके दिल्याने अत्यंत गंभीर स्थितीत नागपूरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणीत फुफ्फुसाचा विकारासोबतच रक्तातील संसर्ग व ‘टीजीए’सारख्या हृदय विकाराचेही निदान झाले. डॉक्टरांनी  उपचार सुरू करून बाळाची प्रकृती स्थिर केली. त्यानंतर गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी केली. एकूणच प्रशासनासह डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे बाळाला नवे आयुष्य मिळाले.     

बाळाचा जन्म ३ फेब्रुवारी रोजी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात झाला आणि ५ फेब्रुवारी रोजी डिस्चार्ज मिळाला. नंतर बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, त्यामुळे २३ फेब्रुवारी रोजी आईने घरगुती उपाय म्हणून बाळाच्या पोटावर जवळपास ६० ते ६५ वेळा गरम लोखंडी सळईने चटके दिले. नंतर बाळाला अमरावती येथील महिला रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात दाखल केले. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी चटके देण्यात आल्याची बाब गंभीरतेने घेत चौकशीचे आदेश दिले. पोलिस अधीक्षक आनंद यांनी ही माहिती पालकमंत्री  बावनकुळे यांना दिली. त्यांनी बाळाच्या उपचारास प्राधान्य देण्याचे व त्याच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. दरम्यान बाळाची प्रकृती अत्यंत गंभीर झाली. त्यामुळे  पुढील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी नागपूरच्या नेल्सन हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला. २७ फेब्रुवारी रोजी ‘ग्रीन कॉरिडॉर’च्या मदतीने या हॉस्पिटलमध्ये  दाखल करण्यात आले. 

पहिले दहा दिवस महत्त्वाचे सलग एक महिन्याच्या उपचारानंतर या बाळाला उद्या शनिवारी सुटी होणार आहे. बाळावर केलेल्या उपचाराची माहिती देताना नेल्सन हॉस्पिटलचे संचालक डॉ. सोनल भगत यांनी सांगितले, बाळाला नवजात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. पहिले दहा दिवस महत्त्वाचे होते. शर्थीच्या उपचारानंतर बाळाची प्रकृती स्थिर झाली. आता आव्हान ‘ट्रान्सपोझिशन आॅफ ग्रेट आर्टरीज’वरील (टीजीए) शस्त्रक्रिया होती. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती. परंतु डॉक्टरांनी आपले अनुभव व कौशल्यपणाला लावून ती यशस्वी केली. 

पाच हजारातून एकाला ‘टीजीए’ आजारपेडियाट्रिक हार्ट सर्जन डॉ. सचिन कुथे यांनी सांगितले, ‘टीजीए’ हा जन्मजात आजार आहे. साधारण पाच हजार बालकांमधून एकाला हा आजार होतो. या आजारात हृदयातून निघणारे दोन मुख्य धमनी, महाधमनी आणि फुफ्फुसीय धमनीची जाग बदलेली असते. यावर शस्त्रक्रिया हाच पर्याय असतो. 

आरबीएसके’मधून नि:शुल्क उपचारया बाळावरील हृद शस्त्रक्रिया राष्टÑीय बाल स्वास्थ आरोग्य कार्यक्रमामधून (आरबीएसके) नि:शुल्क करण्यात आली. या बाळावर डॉ. कुथे यांच्यासह डॉ. विनय कुलकर्णी, डॉ. सतीश देवपुजारी, डॉ. निलेश दारव्हेकर, डॉ. सुचिता खडसे, डॉ. यश बनायत, डॉ. अनुपम बाहे, डॉ. निकिता लालवानी, डॉ. पियुष मालोकर यांनी उपचार केले तर यात सहकार्य राधा साहू, गणेश खरोडे व डॉ. एस. पी. राजन यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूर