शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ट्रान्झिट सेंटरमध्ये वाढतेय एका माकडाचे बाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 20:10 IST

येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये सध्या एक अनोखी घटना घडतेयं. माकडीणीने अव्हेरलेलं तिचे लहानसे बाळ आता येथे बाळस धरू लागले आहे. आईला बिलगून रहावे तसा तो येथील कर्मचाऱ्यांना बिलगून असतो. कर्मचारीदेखील त्याला आईच्या ममतेने मायेचा ओलावा देत आहेत. व्हिडीओ दाखवून त्याच्यात ‘माकडपण’ रुजवत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये सध्या एक अनोखी घटना घडतेयं. माकडीणीने अव्हेरलेलं तिचे लहानसे बाळ आता येथे बाळस धरू लागले आहे. आईला बिलगून रहावे तसा तो येथील कर्मचाऱ्यांना बिलगून असतो. कर्मचारीदेखील त्याला आईच्या ममतेने मायेचा ओलावा देत आहेत. व्हिडीओ दाखवून त्याच्यात ‘माकडपण’ रुजवत आहेत.८ मे रोजी म्हणजे मदर्स डे च्या दोन दिवसापूर्वी हिंगणा रेंजमधून येथील वन विभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या चमूने एका माकडीणीला तिच्या बाळासह रेस्क्यू करून आणले. हिंगणा परिसरात एका घरामध्ये घुसल्याची स्थानिक नागरिकांनी तक्रार केली होती. त्यामुळे या मायलेकांना रेस्क्यू क रून आणण्यात आले होते. दोन दिवस त्यांचा येथे मुक्काम होता. या काळात आई त्याला जवळ घेऊन दुधही देत होती. त्यांना कसलाही आजार व दुखापत नसल्याने दोन दिवसानी म्हणजे १० मे रोजी जंगलामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ही चमू या मायलेकांना जंगलात सोडायला गेली असता वेगळेच घडले. आईने पिलाला न नेता जंगलात धूम ठोकली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. काही वेळाने ती परत येऊन बाळाला घेऊन जाईल, असे वाटल्याने वाट पाहिली. मात्र दोन तासानंतरही ती परत न आल्याने अखेर त्या पिलाला ट्रान्झिट सेंटरला आणण्यात आले.आईपासून ताटातूट झालेले हे पिलू दोन दिवस हिरमुसले होते. मात्र त्याला येथील कर्मचाऱ्यांनी आईसारखी वागणूक देणे व खेळविणे सुरू केले. आता त्याची आईसारखी काळजी घेण्यात येत आहे. जंगलात आईकडून पिल्लू जे शिकतो ते शिकविण्यासाठी त्याला माकडांचे वेगवेगळे व्हिडीओ दाखविणे सुरू आहे. त्यातील आवाज ऐकून आणि हालचाली बघून तो प्रतिसादही देत आहे. साधारणत: माकडाच्या भावना माणसारख्या असतात. तो संवेदनशीलही असतो. मात्र पिलाला सोडून आई निघून गेल्याची ही घटना विरळच मानली जात आहे.व्हिडिओ बघताना पिल्लाचे हावभाव बघण्यासारखे असतात. त्याच्या सर्व क्रीडा माणसाच्या लहान बाळासारख्या आहेत. आईला चिटकून बसावा तसा तो येथील लोकांच्या अंगाला चिटकून बसतो. त्याला मोठे करण्यात यश यायला हवे. आम्ही पूर्ण प्रयत्न करीत आहोत.

कुंदन हाते, मानद वन्यजीव रक्षक

टॅग्स :Monkeyमाकडnagpurनागपूर