शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या, प्रवीण तोगडियांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 18:18 IST

बाळासाहेब ठाकरे, यांना भारतरत्न देऊन गौरव करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केली. ते आज नागूपरमध्ये बोलत होते.

नागपूर : विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला आज २९ वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त आज ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

राम मंदिर आंदोलनात बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्यासह अशोक सिंघल, महंत अवैद्यनाथ आणि रामचंद्र परमहंस यांनीही महत्वाची भूमिका पार पाडली. चार लोकांचं नेतृत्व नसतं तर बाबरी पडली नसती आणि मंदिर उभं राहिलं नसतं, असे म्हणत या चौघांना भारतरत्न देऊन सन्मानित करावे, अशी मागणी त्यांनी केली. तोगडिया यांनी याआधीही ही मागणी केली होती. यासोबतच, जोपर्यंत देशातील हिंदूंना हक्काची घरे मिळणार नाहीत, तोपर्यंत रामराज्य येणार नाही, असंही मत त्यांनी व्यक्त केलं. 

अयोध्येत राम मंदिराची उभारणी होत आहे, याचा आनंद आहे. मी यासाठी माझ्या आयुष्याची ३२ वर्षे, माझा वैद्यकीय व्यवसाय यांचा त्याग केला व त्याचा गर्व असल्याचेही तोगडिया म्हणाले. सोबतच, माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांनी राम मंदिरासाठी सर्वस्व वाहिले. अयोध्येत २०२०मध्ये झालेल्या राम मंदिराच्या पायाभरणी समारंभात बाबरी मशिदीच्या पक्षकारांना बोलावण्यात आले होते. मात्र, राम मंदिर आंदोलनासाठी आयुष्य वेचूनही मला या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले नव्हते. ही बाब खटकली असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PoliticsराजकारणBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेbabri masjidबाबरी मस्जिदbabri masjid verdictबाबरी मशीद निकाल