शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025 : मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
7
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
8
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
9
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
10
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
11
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
12
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
13
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
14
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
15
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
16
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
17
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
18
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
19
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
20
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?

अयोध्येत वर्षअखेर राम मंदिर निर्मितीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 11:02 IST

अयोध्येच्या वादातीत जागेवर श्रीरामाच्या भव्य मंदिराचे निर्माणकार्य वर्षाच्या शेवटी सुरू करण्यात येईल, असा दावा श्री रामजन्मभूमी निर्माण न्यासाचे अध्यक्ष महंत जनमेजय शरण यांनी करून राजकीय चर्चेला विराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

ठळक मुद्देश्री रामजन्मभूमी निर्माण न्यासाचे अध्यक्ष महंत जनमेजय शरण यांचा दावा

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अयोध्येच्या वादातीत जागेवर श्रीरामाच्या भव्य मंदिराचे निर्माणकार्य वर्षाच्या शेवटी सुरू करण्यात येईल, असा दावा श्री रामजन्मभूमी निर्माण न्यासाचे अध्यक्ष महंत जनमेजय शरण यांनी करून राजकीय चर्चेला विराम देण्याचा प्रयत्न केला आहे.महंत जनमेजय शरण खासगी कारणांनी शहरात आले होते. दरम्यान, लोकमतच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क केला. भाजपा व संघाच्या नेत्यांकडून मंदिर निर्माणसंदर्भातील भूमिका व सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून मंदिराच्या निर्माणसंदर्भातील भूमिका जाणण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात ते स्पष्ट म्हणाले की, नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात मंदिराचे निर्माणकार्य सुरू होईल. प्रयाग येथे होणाऱ्या कुंभमेळाव्याच्या पूर्वी मंदिराचा पाया रचण्याचा शुभारंभ निश्चित आहे. ते म्हणाले की, हे काम संत व धर्मगुरूंच्या आशीर्वादाने होईल. शासन व प्रशासनाची भूमिका बाहेरून सहकार्याची राहील. मंदिराच्या निर्माणाला लागणाऱ्या वेळेसंदर्भात ते म्हणाले की, हे इंजिनीअर सांगू शकेल.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने लागेलमहंत जनमेजय शरण यांनी दावा केला की, वर्षाच्या शेवटपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे दिशानिर्देश येऊन जाईल. त्यांचा विश्वास आहे की, मंदिराच्या बाजूनेच निर्णय होईल, कारण हे काम जनभावनेचे आहे. जनताजनार्दन आहे आणि मंदिराचे कार्य जनार्दना(देव)चे आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने लागेल, यात काही शंका नाही.

नेत्यांजवळ पर्याय नाहीअयोध्येचे राममंदिर राजकारणाचा मुद्दा बनले आहे, यावर बोलताना महंत म्हणाले की, आता नेत्यांजवळ दुसरा विकल्प नाही. त्यांना मंदिर निर्माण करावे लागेल. बरेच राजकीय नेते आतापर्यंत मंदिराच्या निर्माण कार्याकडे दुर्लक्ष करीत होते. परंतु संतांनी असा दबाव वाढविला आहे की, राजकीय नेत्यांना मंदिराचा मुद्दा घ्यावाच लागेल. त्यामुळेच केंद्र व राज्य सरकारचे मंत्री अयोध्येत येत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वत: पाच ते सहावेळा अयोध्येत आले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर