शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

अजब प्रेमाची गजब कहानी : नागपुरात व्यापाऱ्याने केला शिक्षिकेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 01:01 IST

शिक्षिका आणि व्यापाऱ्यातील प्रेमकहानी युरोप तसेच दुबईपर्यंत पोहचली. नागपूर अन् भारतातच नव्हे तर या दोघांनी देश-विदेशात सैरसपाटा करून मौजमजा केली. तब्बल चार वर्षे ते पती-पत्नीसारखे एकमेकांवर हक्क दाखवत सोबत राहिले. युवकाने युरोप आणि दुबई या देशात नेऊन बलात्कार केला. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्यात वाद सुरू झाला अन् अखेर या प्रकरणात प्रतापनगर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देयुरोप, दुबईत मौजमजा : लग्नास नकार, पोलिसांत तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षिका आणि व्यापाऱ्यातील प्रेमकहानी युरोप तसेच दुबईपर्यंत पोहचली. नागपूर अन् भारतातच नव्हे तर या दोघांनी देश-विदेशात सैरसपाटा करून मौजमजा केली. तब्बल चार वर्षे ते पती-पत्नीसारखे एकमेकांवर हक्क दाखवत सोबत राहिले. युवकाने युरोप आणि दुबई या देशात नेऊन बलात्कार केला. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्यात वाद सुरू झाला अन् अखेर या प्रकरणात प्रतापनगर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. जेठानंद ऊर्फ जय सुरेशकुमार नारायणी (वय ३२, सिंधी कॉलनी, खामला) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.तक्रार करणारी २६ वर्षीय तरुणी दुबईतील एका इंडियन स्कूलमध्ये नोकरीवर होती. नागपूरमध्ये असताना २०१४ च्या प्रारंभी ती खामल्यातील जेठानंदच्या गिफ्ट अँड आर्टिकल्स दुकानात आली होती. तेथे तिने महागडे गिफ्ट घेतल्यामुळे जेठानंदने बिल बनविताना तिचा मोबाईल नंबर घेतला. काही दिवसांनंतर जेठानंदने तिला फोन करून ‘स्पेशल ग्राहक' म्हणून तुमची निवड झाल्याचे तसेच तुम्हाला गिफ्ट लागल्याचा फोन करून आपल्या दुकानात बोलविले. यावेळी जेठानंदने तिला सरप्राईज गिफ्ट म्हणून महागडी घड्याळ दिली. तेव्हापासून या दोघांमध्ये मैत्री झाली. ते रोज एकमेकांना फोन आणि मॅसेज करू लागले. जेठानंदचे वाडीलाही कपड्याचे दुकान आहे. त्याने एकदा तिला कपड्याच्या दुकानात नेऊन पाहिजे तशी खरेदी करण्यास सांगितले. त्यानंतर तिच्याकडून बिल घेण्यास नकार दिला. त्याचा तामझाम पाहून तरुणी त्याच्यावर भाळली. त्याने तिला प्रपोज करताच तिने होकार दिला. दरम्यान, २०१७ मध्ये हे दोघे दुबई आणि त्यानंतर युरोपमध्ये गेले. तेथे या दोघांनी पती-पत्नीसारखे एकमेकांसोबत दिवस घालविले. त्या एकांत क्षणाचे फोटो जेठानंदने मोबाईलमध्ये काढून ठेवले. परत आल्यानंतर नागपुरातील तारांकित हॉटेलमध्येही त्याने तिच्याशी अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित केले.अन् खटका उडाला१२ फेब्रुवारी २०१४ ते १६ ऑक्टोबर २०१८ पर्यंत त्यांच्यात सर्व सुरळीत होते. कारण विचारले असता त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि तू खालच्या जातीची आहे, असे म्हणत तिला लग्नास नकार दिला. याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यास ठार मारेन, अशी धमकीही दिली. वारंवार समजावूनही तो ऐकत नसल्याचे पाहून तरुणीने प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी जेठानंद नारायणी याच्याविरुद्ध बलात्कार करून धमकी देण्याच्या आरोपाखाली तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार