लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : काेराेनाचा दुसऱ्या लाटेतील संसर्ग आता ओसरत आहे. परंतु नागरिकांनी गाफिल राहू नये. काेराेना संक्रमणासह म्युकरमायकाेसिस आजाराने रुग्णाच्या चिंतेत भर घातली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती सुरू केली आहे.
अड्याळ येथील ग्रामपंचायत भवनात आयोजित कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण राऊत, विस्तार अधिकारी सुनील महतकर, सरपंच मंगला तांबे, उपसरपंच अनिल तलमले, ग्रामसेवक शालू प्रधान, मुख्याध्यापक अनिल राठोड, विनोद डहारे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांनी कोरोना संसर्ग व म्युकरमायकाेसिस आजाराबाबत माहिती देताना, काेराेनातून बरे झालेल्या रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरणे टाळावे. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग व सॅनिटायझरचा नियमित वापर करावा, असे सांगितले. संसर्गानंतर म्युकरमायकाेसिस आजाराचे रुग्ण आढळत असल्याने, पुढील काही महिने प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. या आजाराची लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार घ्यावे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी तलाठी, अंगणवाडी सेविका, आशावर्कर व ग्रामस्थ उपस्थित होते.
....
लसीकरण आपल्या दारी
तालुक्यातील प्रत्येक गावात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणा प्रयत्नरत आहे. लसीकरण आपल्या दारी माेहिमेंतर्गत आशावर्कर व अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन नागरिकांना लस घेण्यासाठी प्राेत्साहित करीत आहेत. अड्याळ येथील शाळेत पुन्हा लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या माेहिमेत डॉ. केवल कोरडे, डॉ. रोसिना मोहन्ना, मुख्याध्यापक अनिल राठोड, लसीकरण अधिकारी रामराव टोंग, बालाजी चिटगीर, बंडू कुळमेथे, बाबा कडू, धनमाला वानखेडे, शीला देशमुख, ममता देशमुख आदींचा समावेश होता.
===Photopath===
290521\img-20210528-wa0128.jpg
===Caption===
अड्याळ येथे ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापूरे