शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पुरस्काराने समाजासाठी जगण्याचे बळ मिळाले

By admin | Updated: May 29, 2014 03:28 IST

भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील अग्रणी क्रांतीकारक स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त

नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील अग्रणी क्रांतीकारक स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर स्मारक समितीतर्फे सामाजिक अभिसरण पुरस्कार व तेजस्विनी महिला गौरव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झटणार्‍या तसेच स्वातंत्र्याच्या यज्ञात समस्त कु टुंबाचे योगदान असणार्‍या यमुनाबाई, येसुबाई व शांताबाई सावरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ यावेळी नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण चिंधुजी दराडे आणि आदिवासी विकास आयुक्तालयाच्या अपर आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांना सामाजिक अभिसरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार समारंभ विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात पार पडला. याप्रसंगी प्रज्ञा प्रमोद राऊत यांना तेजस्विनी महिला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सावरकर प्रेमींच्या भरगच्च उपस्थितीत हा सोहळा पार पडला. याप्रसंगी सत्कारमूर्तींंसह समितीचे अध्यक्ष अशोक ठाकरे, डॉ. राजेंद्र नाईकवाडे, शिरीष दामले प्रामुख्याने उपस्थित होते. शासकीय नोकरीच्या माध्यमातून समाजसेवा करणारे आणि नागपूरातील अनेक सामाजिक संस्थाविषयी कृतज्ञता असलेल्या उच्चपदस्थ प्रवीण दराडे आणि पल्लवी दराडे तसेच अंध व अपंगांसाठी कार्य करणार्‍या प्रज्ञा राऊत यांच्या कार्याचा परिचय डॉ. नाईकवाडे यांनी करुन दिला. यावेळी प्रवीण दराडे यांनी स्वा. सावरकरांच्या महान कार्याला मनोगतातूीन सलाम केला. सावरकरांच्या विचारांचे अनुकरण करीत आजच्या युवापिढीने कार्य करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. पल्लवी दराडे यांनी हा पुरस्कार लाभल्याबद्दल आनंद व्यक्त केला. लहानपणापासून पालकांच्या सुसंस्कारामुळे आपण चांगले काम करु शकलो. यापुढेही आपण सामाजिक दायित्वाच्या भावनेतून कार्य करीत राहू, असे त्या म्हणाल्या. प्रज्ञा राऊत यांनी आपल्या संस्थेमार्फत सुरु असलेले कार्य स्वामी विवेकानंदांच्या संदेशाचे पालन असल्याचे सांगितले. संत तुकारामांच्या उपदेशानुसार यापुढेही आपण काम करीत राहणार, असे त्या म्हणाल्या. प्रारंभी मंजिरी वैद्य हिने सावरकरांचे ‘शतजन्म शेधताना’ हे गीत सादर केले. जयंत उपगडे यांनी ‘जयोस्तुते’ गीत सादर केले. अशोक ठाकरे यांनी आभार मानले.

अंकिता पाचखेडे हिने संचालन केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वेशभुषेत यावेळी नामदेव गणपती कार्यक्रमात आकर्षणाचा विषय ठरले. याप्रसंगी पल्लवी दराडे यांचे माता-पिता हेमा व हरिश कांबळे, डॉ. वि. स. जोग प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)