शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेला यूजीसीचा स्वायत्त दर्जा; विद्यापीठाचा सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2023 18:51 IST

Nagpur News लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेला (एलआयटी) दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाने स्वायत्त दर्जा प्रदान केला आहे.

नागपूर : लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेला (एलआयटी) दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाने स्वायत्त दर्जा प्रदान केला आहे. याबाबत पत्र देत विद्यापीठ अनुदान आयोगाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरला कळविले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगा (यूजीसी) ने स्वायत्त दर्जा प्रदान केल्याने एलआयटीला आणखी एक बहुमान प्राप्त झाला आहे.

स्वायत्त दर्जा प्राप्त करण्याकरिता विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी आधी लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेचे (एलआयटी) पहिल्यांदा नॅक (NAAC) करवून घेतले. त्यात एलआयटीला ए प्लस (A+) दर्जा मिळवून दिला. एलआयटीच्या कार्यकाळातील ही पहिलीच नॅक ( NAAC) व्हिजीट होती. नॅक (NAAC) चा ए प्लस (A+) दर्जा प्राप्त होताच दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी स्वायत्त दर्जा प्राप्त करण्याकरिता प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या बरोबरच एलआयटीच्या एनबीए (NBA) मूल्यांकनाकरिता प्रस्ताव पाठवण्यात आला होता. नुकताच एनबीए (NBA) दर्जा सुद्धा एलआयटीला प्राप्त झालेला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्न लक्ष्मीनारायण तंत्र संस्थेने स्वायत्त दर्जा प्राप्त व्हावा म्हणून दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाकडे दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी प्रस्ताव पाठविला होता. विद्यापीठ अनुदान आयोगाने २७ जून २०२३ रोजी झालेल्या बैठकीत स्वायत्त महाविद्यालयांबाबत असलेल्या स्थायी समितीने केलेल्या शिफारसी मान्य केल्या. स्थायी समितीने केलेल्या शिफारसीनुसार दहा वर्षाच्या कालावधी करिता यूजीसी कलम ७.५ (महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा प्रदान करणे आणि स्वायत्त महाविद्यालयांमध्ये दर्जा राखण्यासाठी उपाययोजना) अंतर्गत २०२३-२४ ते २०३२-२०३३ या शैक्षणिक सत्राकरिता ही स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे स्वायत्त महाविद्यालयांसाठी असलेल्या नियमांच्या सर्व तरतुदींचे एलआयटीला पालन करावे लागणार आहेत.

यूजीसीचा एलआयटीला स्वायत्त दर्जाविद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला स्वायत्त दर्जा प्रदान केला आहे. ही आमच्याकरिता आनंदाची बाब आहे. याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी व विद्यापीठाच्या सर्व अधिकाऱ्यांचे सतत सहकार्य आणि प्रोत्साहन लाभले आहे. LITAA आणि आमचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानतो.

डॉ. राजू मानकर, संचालक लक्ष्मीनारायण तंत्र संस्था

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र