लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहर गुन्हेगारीमुक्त करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी ऑटोमॅटिक अलर्ट, रिमोट मॉनिटरिंग फिडबॅक व कंट्रोल सिस्टीमने सज्ज नियंत्रण कक्षाची तयारी सुरु केली आहे. पोलीस आयुक्तालयातील या अत्याधुनिक नियंत्रण कक्षाचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आले.पोलीस विभागाची ऑटोमॅटिक अलर्ट, रिंमोट मॉनिटरिंग फिडबॅक व कंट्रोल सिस्टीम नागपूर शहरातील प्रत्येक हॉटेल, बार रेस्टॉरंट, सलून व स्पा तसेच दारूच्या दुकानांमध्ये लावण्याची योजना आहे. याला बिग -व्ही टेलिकॉम व आयटीआय लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून चालवले जाईल. प्रत्येक संस्थानला एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर दिला जाईल. यासोबतच संस्थानच्या दार्शनिक स्थानावर युनिक नंबरचे एक स्टीकर लावले जाईल. या नवीन प्रयोगाच्या माध्यमातून शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवले जाईल. पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून ही यंत्रणा काम करेल.उद्घाटन कार्यक्रमात सहपोलीसआयुक्त रवींद्र कदम, अपर पोलीस आयुक्त शशिकांत महागांवकर, अपर पोलीस आयुक्त नीलेश भरणे, डीसीपी विक्रम साळी, बिग व्ही टेलिकॉमचे किशोर डागा, आयटीआय लिमिटेड कंपनी के राजेश कुमार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पोलीस निरीक्षक अशोक बागुल यांनी केले.
नागपुरातील हॉटेल, बार, सलूनमध्ये लागणार 'ऑटोमॅटिक अलर्ट सिस्टीम'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:32 IST
शहर गुन्हेगारीमुक्त करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी ऑटोमॅटिक अलर्ट, रिमोट मॉनिटरिंग फिडबॅक व कंट्रोल सिस्टीमने सज्ज नियंत्रण कक्षाची तयारी सुरु केली आहे. पोलीस आयुक्तालयातील या अत्याधुनिक नियंत्रण कक्षाचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आले.
नागपुरातील हॉटेल, बार, सलूनमध्ये लागणार 'ऑटोमॅटिक अलर्ट सिस्टीम'
ठळक मुद्देपोलीस आयुक्तालयात अत्याधुनिक नियंत्रण कक्ष : पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले उद्घाटन