शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ओला, उबेरविरोधात आॅटोचालकांची निदर्शने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 23:00 IST

राजकारणी आणि प्रशासनाचा वरदहस्त लाभल्याने ओला, उबेर या कंपन्यांची प्रवासी वाहतूक शहरात बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा आरोप आॅटो चालक-मालक संघटनेने केला आहे. ओला, उबेरच्या प्रवासी वाहतुकीमुळे आॅटोचालकांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचा आरोप करीत संघटनेतर्फे या कंपन्यांविरोधात मंगळवारी निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देव्यवसायावर परिणाम झाल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : राजकारणी आणि प्रशासनाचा वरदहस्त लाभल्याने ओला, उबेर या कंपन्यांची प्रवासी वाहतूक शहरात बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा आरोप आॅटो चालक-मालक संघटनेने केला आहे. ओला, उबेरच्या प्रवासी वाहतुकीमुळे आॅटोचालकांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचा आरोप करीत संघटनेतर्फे या कंपन्यांविरोधात मंगळवारी निदर्शने करण्यात आली.संघटनेचे अध्यक्ष नितीन सोळंके यांच्या नेतृत्वात सुभाषनगर टी-पॉर्इंटवर ओला कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते, मात्र त्यांच्याकडून दखल न घेतल्यामुळे आंदोलन करावे लागत असल्याचे सोळंके यांनी सांगितले. आॅटोचालकांना कायदेशीर परवाना घेणे, युनिफॉर्म वापरणे असे अनेक नियम लागू आहेत, मात्र यातील कुठलेही नियम ओला, उबेर कंपन्यांसाठी नाहीत. तरीही आरटीओ अधिकाऱ्यांद्वारे यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे या कंपन्यांचा व्यवसाय भरात असून आॅटोचालकांवर मात्र व्यवसाय बंद करण्याची वेळ आली असल्याचा आरोप त्यांनी केला. शेकडो कोटींचा महसूल बुडविणाऱ्या ओला, उबेरवर आणि आरटीओच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, आॅटोचालकांप्रमाणे ओला, उबेर चालकांना बॅच बिल्ला लागू करण्यात यावा, आॅटोप्रमाणे या प्रवासी वाहनांचेही भाडे निर्धारित करावे, नोंदणी नसलेल्या प्रवासी वाहनांवर कारवाई करण्यात यावी, आदी मागण्या संघटनेने ठेवल्या. आंदोलनात संघटनेचे उपाध्यक्ष प्रतीक बालपांडे, अ‍ॅड. नितीन रुडे, सचिव अविनाश जनबंधू, नियाज अली, नीलेश तिघरे, गणेश सोळंके, बंटी बोरीकर आदींचा सहभाग होता.

टॅग्स :Olaओलाagitationआंदोलन