शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

बुकी अजय राऊतच्या अड्ड्यावर धाड

By admin | Updated: February 21, 2016 02:38 IST

अपहरण आणि पावणेदोन कोटीच्या खंडणी प्रकरणामुळे एकदम प्रकाशझोतात आलेला कुख्यात बुकी अजय श्यामराव राऊत (रा. त्रिमूर्तीनगर) याच्या नरेंद्रनगरातील हायटेक क्रिकेट सट्टा अड्ड्यावर ...

तीन बुकी गजाआड : राऊतसह दोघे फरारनागपूर : अपहरण आणि पावणेदोन कोटीच्या खंडणी प्रकरणामुळे एकदम प्रकाशझोतात आलेला कुख्यात बुकी अजय श्यामराव राऊत (रा. त्रिमूर्तीनगर) याच्या नरेंद्रनगरातील हायटेक क्रिकेट सट्टा अड्ड्यावर गुन्हेशाखेच्या पोलिसांनी धाड घालून रोख आणि मोबाईलसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. राऊतचा एक भागीदार तसेच दोन पंटर अशा तिघांना अटक करण्यात आली. तर, स्वत: राऊत आणि त्याचा भागीदार फरार असल्याची माहिती गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली. नरेंद्रनगरात साईकृपा सोसायटी असून, तेथे सुमती अपार्टमेंटमधील ४०१ क्रमांकाची सदनिका अजय राऊतच्या मालकीची आहे. ती त्याने आनंद तुकाराम बोंदरे याला हायटेक क्रिकेट सटट्याचा अड्डा चालविण्यासाठी दिली होती. तेथे क्रिकेट सामन्यावर रोज लाखोंची खयवाडी-लगवाडी होत असल्याची माहिती कळताच गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त नीलेश राऊत यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक सुधीर बघेल, हवलदार मंगेश करडे, प्रकाश सिडाम, राजू धोपटे, सुरेश हिंगणेकर, नायक विजय दासरवार, सतीश राऊत, सुजीत देव्हारे, अमोल पडघान यांनी शुक्रवारी मध्यरात्री अड्ड्यावर धाड घातली. यावेळी तेथे आनंद बोंदरे, प्रमोद मनोहर भोजापुरे (रा. नंदनवन) आणि सुरेश नत्थूजी तुमडाम (रा. पिपळा, हुडकेश्वर) दक्षीण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्यावर खयवाडी करताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एलसीडी, ३ रेकॉर्डर बॉक्स, ३८ मोबाईल, २ लॅपटॉप, प्रिंटर, खयवाडीचा पाना आणि रोख ५४ हजार, ६०० रुपये असा एकूण २ लाख, ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अजनी ठाण्यात गुन्हा दाखल करून या तिघांना अटक करण्यात आली. अजय राऊत आणि जितू कमनानी फरार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.(प्रतिनिधी)नगपुरातील सर्वात मोठी खंडणी ठरलेले पावणेदोन कोटी रुपये भद्रे गँगला दिल्यामुळे कुख्यात अजय राऊत प्रकरण सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनले. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी त्याच्या अड्ड्यावर केलेल्या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.