शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

श्रोत्यांनी अनुभवला नाट्यसंगीताचा गारवा

By admin | Updated: December 2, 2014 00:36 IST

सुसाट वाहणारा वारा अचानक शांत होऊन केवळ आल्हाददायक झुळुक शरीराला स्पर्श करीत राहावी असेच काहीसे आज संगीत चाहत्यांसोबत घडले. जिकडे-तिकडे कानठळ्या बसविणाऱ्या संगीताची चलती

गंधर्वगीते : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे आयोजननागपूर : सुसाट वाहणारा वारा अचानक शांत होऊन केवळ आल्हाददायक झुळुक शरीराला स्पर्श करीत राहावी असेच काहीसे आज संगीत चाहत्यांसोबत घडले. जिकडे-तिकडे कानठळ्या बसविणाऱ्या संगीताची चलती असताना जुन्याजाणत्या श्रोत्यांना नाट्यसंगीताचा गारवा अनुभवायला मिळाला. निमित्त होते नानासाहेब गोखले यांच्या प्रथम मासिक स्मृतिदिनाचे.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्रातर्फे शंकरनगर चौकातील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात ‘गंधर्वगीते’ हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात विवेक गोखले, रूपाली बक्षी, डॉ. साधना शिलेदार व विशाखा मंगदे यांनी बालगंधर्व यांची अजरामर नाट्यपदे सादर केली. ‘विद्याहरण’ नाटकातील ‘मधु मधुरा... ’ गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. डॉ. साधना शिलेदार यांनी उत्कृष्ट पद्धतीने गायन केले. यानंतर गोखले यांनी ‘मानापमान’ नाटकातील ‘नयने लाजवित...’, विशाखा मंगदे यांनी ‘स्वयंवर’ नाटकातील ‘नरवर कृष्णासमान’, तर रुपाली बक्षी यांनी ‘सौभद्र’ नाटकातील ‘प्रेम नच जाई’ गीत सादर केले. याशिवाय ‘विद्याहरण’ नाटकातील ‘मधुकर वनवन फिरत...’, ‘सौभद्र’ नाटकातील ‘वद जाऊ कुणाला शरण...’, ‘शाकुंतल’मधील ‘वेड्या मना तळमळसी’ अशा विविध श्रवणीय नाट्यगीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. तबल्यावर राम ढोक, तर संवादिनीवर संजय इंदुरकर यांनी साथसंगत केली. प्रकाश एदलाबादकर यांनी निवेदन केले. प्रारंभी प्रमुख अतिथी नीला फडणवीस यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर बसोलीचे चंद्रकांत चन्ने उपस्थित होते. (प्रतिनिधी)