शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या  ठगबाज मंचलवारच्या मालमत्तेचा लिलाव करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 20:46 IST

४९२ गुंतवणूकदारांना १७ कोटी ९८ लाख ५३ हजार रुपयांनी लुबाडणारा ठगबाज हरिभाऊ मंचलवार याची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्यात यावी व त्या मालमत्तेचा तातडीने लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यात यावे, अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांमध्ये अरुणा खंडागळे व इतर नऊ गुंतवणूकदारांचा समावेश आहे.

ठळक मुद्देगुंतवणूकदारांची याचिका : हायकोर्टाने सरकारला मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ४९२ गुंतवणूकदारांना १७ कोटी ९८ लाख ५३ हजार रुपयांनी लुबाडणारा ठगबाज हरिभाऊ मंचलवार याची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्यात यावी व त्या मालमत्तेचा तातडीने लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यात यावे, अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांमध्ये अरुणा खंडागळे व इतर नऊ गुंतवणूकदारांचा समावेश आहे.या प्रकरणावर बुधवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून यावर तीन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. मंचलवार व त्याच्या पत्नीने गुंतवणूकदारांकडून २ टक्के व्याजाने पैसे घेतले होते. सुरुवातीला त्याने गुंतवणूकदारांचे पैसे व्याजासह परत केले. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार त्याच्याकडे आकर्षित झाले. त्यानंतर त्याने ४९२ गुंतवणूकदारांचे १७ कोटी ९८ लाख ५३ हजार रुपये परत केले नाही. मंचलवार फरार असून, पोलिसांनी केवळ त्याच्या बायकोविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले आहे. सक्षम प्राधिकाऱ्याने एमपीआयडी कायद्यांतर्गत मंचलवारची काही मालमत्ता जप्त केली आहे; पण त्या मालमत्तेचा तातडीने लिलाव करण्यासाठी काहीच प्रयत्न सुरू नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. रजनीश व्यास यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयInvestmentगुंतवणूक