शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कर्मयोगीपेंक्षा योगींचे आकर्षण वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:29 IST

संत पंरपरा आणि समाजसुधारणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, याची प्रचिती संत गाडगेबाबा व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याकडे पाहिल्यावर येते. या दोघांनीही आपल्या कार्यातून शिक्षणासोबतच विवेकवादी दृष्टीही दिली आणि म्हणूनच ते कर्मयोगी ठरले. परंतु दुर्दैवाने आज समाजात कर्मयोगींपेक्षा योगींचे आकर्षण वाढतेय. शिवाजी शिक्षण संस्थेच्याच अनेक प्राचार्यांच्या कक्षात देवतांचे फोटो असतात आणि नेमाने त्यांची आरतीही ओवाळली जाते. हे बघून भाऊसाहेब कसे सुखावतील, असा खडा सवाल डॉ. श्रीकांत तिडके यांनी विचारला.

ठळक मुद्देश्रीकांत तिडके : डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संत पंरपरा आणि समाजसुधारणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, याची प्रचिती संत गाडगेबाबा व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याकडे पाहिल्यावर येते. या दोघांनीही आपल्या कार्यातून शिक्षणासोबतच विवेकवादी दृष्टीही दिली आणि म्हणूनच ते कर्मयोगी ठरले. परंतु दुर्दैवाने आज समाजात कर्मयोगींपेक्षा योगींचे आकर्षण वाढतेय. शिवाजी शिक्षण संस्थेच्याच अनेक प्राचार्यांच्या कक्षात देवतांचे फोटो असतात आणि नेमाने त्यांची आरतीही ओवाळली जाते. हे बघून भाऊसाहेब कसे सुखावतील, असा खडा सवाल डॉ. श्रीकांत तिडके यांनी विचारला. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त धनवटे नॅशनल कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र आणि शिवाजी विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यान कार्यक्रमात ते ‘डॉ. पंजाबराव देशमुख व संत गाडगेबाबा यांचे तत्त्वज्ञान व वास्तव’ या विषयावर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दिलीप इंगोले तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, हेमंत काळमेघ यांच्यासह मंचावर शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. के. बुरघाटे व धनवटे नॅशनल कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. ए. चंगोले उपस्थित होते. श्रीकांत तिडके पुढे म्हणाले, तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांच्यातील दुवा म्हणजे पंजाबराव देशमुख आहेत. महाराष्ट्रातील या महापुरुषांच्या विवेकवादी परंपरेने समाजाला दिशा दिली. या माणसांच्या कर्तृत्वाबद्दल आपण नेहमी ऐकतो. परंतु त्यांना समजून घेण्यात आपण कमी पडलो हे वास्तव आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. संजय आवटे यांनी ‘डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विचारांची प्रासंगिकता’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते गाडगेबाबांच्या शेवटच्या कीर्तनाचे पुस्तक आणि या व्याख्यानमालेतील आतापर्यंतच्या सर्व वक्त्यांच्या भाषणाचा संग्रह असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

टॅग्स :Dhanvate National Collegeधनवटे नॅशनल कॉलेजnagpurनागपूर