शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील ३४ शाळांचा पट ५ पेक्षाही कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 10:43 IST

खेडोपाडी ज्ञानगंगा पोहचविण्याचे कार्य शासनाने स्थानिक स्वराज संस्थेच्या शाळा उभारून केले. पण काळाच्या ओघात सरकारी शाळांचे अस्तित्व झपाट्याने कमी होत चालले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था शिक्षण व्यवस्थेपुढे प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खेडोपाडी ज्ञानगंगा पोहचविण्याचे कार्य शासनाने स्थानिक स्वराज संस्थेच्या शाळा उभारून केले. पण काळाच्या ओघात सरकारी शाळांचे अस्तित्व झपाट्याने कमी होत चालले आहे. गेल्या शैक्षणिक सत्रात जि.प.च्या शाळांची पटसंख्या घसरल्याने २४ शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे इतरत्र समायोजन केले होते. यंदाही मोठी गाज जि.प. शाळांवर पडण्याची शक्यता आहे. कारण ३४ शाळांचा पट हा ५ पेक्षाही कमी असून, भिवापूरच्या एका शाळेत तर विद्यार्थ्यांची पटसंख्या १ आहे. दिवसेंदिवस घसरत चाललेल्या पटसंख्येमुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जि.प. च्या शाळांची पटसंख्या वाढावी यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न केले जात आहे. विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तक, मध्यान्ह भोजन पुरविण्यात येत आहे. त्याचबरोबर शाळांचे डिजिटलायझेशन, शाळांची रंगरंगोटीच्या माध्यमातून शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असतानाही जि.प.च्या शाळांचा पट दिवसेंदिवस घसरत आहे आणि शाळांना घरघर लागली आहे. गेल्यावर्षी २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या २४ शाळा बंद करून, विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात आले होते. यंदा तर २० पेक्षा कमी असलेल्या पटसंख्येच्या शाळांची यादी मोठी आहे. जिल्ह्यात जि.प.च्या १५३८ वर शाळा असून येथे ४३०० वर शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी जवळपास एक हजारावर शाळा डिजिटल आहेत. मात्र ग्रामीण भागात इंग्रजी शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे जि.प. शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झालेले आहे. त्यामुळे २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा एकतर बंद करण्याचा किंवा त्या लगतच्या शाळांमध्ये समायोजित करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र