शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सफाई कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, एकच खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2022 15:20 IST

गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्याच्यासोबत रॉकेल भरलेली बाटली होती. आरडाओरड करत त्यांनी बाटलीतील रॉकेल अंगावर घेत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देपोलिसांचे प्रसंगावधान : मोठी घटना टळली 

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : नोकरीत स्थायी करावे, या मागणीसाठी एका अस्थाई सफाई कर्मचाऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून लगेच त्याला ताब्यात घेतल्याने संभाव्य अनर्थ टळला. 

विनोद नंदकिशोर मेहरुलिया (५२) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. टेका नाका झोनमधील अन्न वितरण प्रणाली कार्यालयात तो १९८१ पासून साफसफाईचे काम करतो. ३९ वर्षे होऊनही प्रशासनाने त्याला स्थायी नियुक्ती दिली नाही. त्यामुळे त्याने प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले. तक्रार आणि निवेदनही दिले. मात्र त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या मेहरुलिया यांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.

त्याच्यासोबत रॉकेल भरलेली बाटली होती. आरडाओरड करत त्यांनी बाटलीतील रॉकेल अंगावर घेत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेतल्याने संभाव्य अनर्थ टळला. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती कळताच सदरचे ठाणेदार विनोद चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून मेहरुलिया याला ताब्यात घेतले.जिल्हाधिकाऱ्यांनी केले समुपदेशन 

या घटनेची माहिती कळताच जिल्हाधिकारी आर. विमला यांनी मेहरोलिया याला समोर बसवून त्याचे समुपदेशन केले.  तांत्रिक अडचणी समजावून सांगत त्याला शासकीय नोकरीत सामावून घेता येत नसल्याचे समजावून सांगितले.

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयLabourकामगार