शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
4
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
5
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
6
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
7
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
8
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
9
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
10
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
11
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
12
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
14
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
15
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
16
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
17
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
18
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
19
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
20
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...

चारित्र्यावर संशय, आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा

By admin | Updated: November 4, 2016 02:23 IST

भारतामध्ये विवाहाला धार्मिक विधी व पवित्र बंधन मानले जाते.

हायकोर्टाचे मत : भारतात विवाहाला मानतात पवित्र बंधनराकेश घानोडे   नागपूर भारतामध्ये विवाहाला धार्मिक विधी व पवित्र बंधन मानले जाते. ही मूल्ये जपणाऱ्या समाजातील विवाहित महिलेच्या चारित्र्यावर कोणी वारंवार संशय घेत असेल तर ही कृती आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा ठरते, असे महत्त्वपूर्ण मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले आहे.प्रकरणातील पती दारूच्या नशेमध्ये पत्नीला नेहमीच मारहाण करीत होता. तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळे पत्नीने स्वत:ला जाळून आत्महत्या केली होती. कायद्यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. विवाहित महिलेच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेणे या स्पष्टीकरणांतर्गत मोडते. विवाहाला धार्मिक विधी व पवित्र बंधन मानणाऱ्या समाजातील कोणतीही महिला असे मानहानीजनक आरोप सहन करू शकत नाही. विवाहानंतर महिलेसाठी माहेरची दारे बंद झालेली असतात. अशा वेळी पतीही निर्दयतेने व क्रूरतेने वागत असल्यास महिलेला खोल डोहात बुडाल्यासारखे वाटते. या परिस्थितीत ती दु:ख आणि मानहानीतून स्वत:ची सुटका करण्यासाठी जीवन संपविण्याचा मार्ग निवडते, असे न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी हा निर्णय दिला आहे.असे आहे प्रकरणनरेश केशव गाणार (३४) असे आरोपीचे नाव असून, तो शेकापूर (बाई), ता. हिंगणघाट, जि. वर्धा येथील रहिवासी आहे. मृताचे नाव ज्योती होते. २००९ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. नरेशला दारूचे व्यसन होते. तो दारूच्या नशेत ज्योतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत होता. ४ एप्रिल २०१४ रोजी आरोपीने याच वागणुकीची पुनरावृत्ती केली. रोजची मानहानी असह्य झाल्यामुळे ज्योतीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. आरोपीने तिला उपचारासाठी रुग्णालयात भरती केले होते. पण काही दिवसांनी तिचा मृत्यू झाला. दोनपैकी एका मृत्युपूर्व बयानात तिने आरोपीच्या क्रूरतापूर्ण वागणुकीची माहिती दिली होती.सत्र न्यायालयातील शिक्षा२८ आॅगस्ट २०१५ रोजी वर्धा सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास तर, कलम ४९८-अ (विवाहितेचा छळ) अंतर्गत दोन वर्षे कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.हायकोर्टात दोष कायमउच्च न्यायालयाने आत्महत्येस प्रवृत्त करणे व विवाहितेचा छळ हे आरोपीवरील दोन्ही दोष कायम ठेवले. आरोपी वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे त्याच्या पत्नीने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. विवाहित महिलेच्या चारित्र्यावर संशय घेणे क्रूरता आहे. परिणामी सत्र न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचे काहीच कारण नाही असे उच्च न्यायालयाने आरोपीवरील दोष कायम ठेवताना स्पष्ट केले. मुलामुळे कारावासात दयाउच्च न्यायालयाने आरोपीच्या मुलामुळे कारावासाच्या शिक्षेत दया दाखवली. आरोपी एप्रिल-२०१४ पासून कारागृहात आहे. यापूर्वी त्याने कोणताही गुन्हा केला नव्हता. आरोपीला अटक झाली तेव्हा त्याचा मुलगा ५ वर्षे वयाचा होता. आरोपी कारागृहात असल्यामुळे मुलाचे शिक्षण व विकासाची योग्य पद्धतीने काळजी घेतली जाऊ शकली नाही. यामुळे कारावासाच्या बाबतीत आरोपीला दया दाखविण्यात यावी अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. न्यायालयाने ही विनंती मंजूर करून आरोपीने आतापर्यंत भोगली तेवढीच शिक्षा पुरेशी ठरवली व त्याला कारागृहातून मुक्त करण्याचे निर्देश दिलेत. दंड व अन्य शिक्षा कायम ठेवण्यात आली.