शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील हल्लेखोर वाघीण गोरेवाडा प्राणीसंग्रहलयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 11:41 PM

मागील दोन महिन्यांपासून मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वावरणाऱ्या ई-१ या वाघिणीला सोमवारी सायंकाळी गोरवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाच्या बचाव केंद्रात ४.४५ वाजता दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देदोघांचा घेतला होता बळी : रेस्क्यु टिमने केले जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील दोन महिन्यांपासून मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वावरणाऱ्या ई-१ या वाघिणीला सोमवारी सायंकाळी गोरवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाच्या बचाव केंद्रात ४.४५ वाजता दाखल करण्यात आले. दोन जणांचा बळी घेऊन एकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या या वाघिणीला मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गोलाई या गावाजवळील जंगलात रेस्क्यु टिमने रविवारी सायंकाळी जेरबंद केले होते. 

ही वाघीण ब्रह्मपुरी वनविभागातील आहे. ब्रह्मपुरी वनक्षेत्र परिसरात या वाघिणीचा बराच उपसर्ग वाढल्याने तिला ३१ मे रोजी तेथून पकडून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या डोलार येथील कोअर झोनमध्ये सोडण्यात आले होेते. तिला बसविण्यात आलेल्या कॉलर आयडी नुसार ‘ई-१’ हा क्रमांक असल्याने या नावानेच ती वनविभागामध्ये ओळखली जाते.मागील दोन महिन्यांच्या काळामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये वावरताना तिने दोघांवर हल्ला करून ठार केले होते. २ जुलैच्या रात्री केकदाखेडा गावातील सात वर्षांच्या मुलीवर हल्ला केला होता. अनेक  शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ला केला होता. ३०ऑगस्टला सायंकाळी दादरा गावातील शोभाराम चव्हाण यांच्यावर हल्ला करून ठार केले होते. या घटनेनंतर वाघिणीच्या शोधात निघालेल्या गावकऱ्यांवर केलेल्या हल्ल्यात दिलीप चव्हाण जखमी झाले होते.गावकरी संतप्त झाल्याने प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी वाघिणीला पकडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ३१ ऑगस्टला चमू निघाली. मात्र पहिल्या दिवशी वाघिणीऐवजी संतप्त गावकऱ्यांचाच सामना त्यांना करावा लागला. त्यामुळे चमू परत आली. दुसऱ्या दिवशी १ सप्टेंबरच्या सायंकाळी इंजेक्शन देऊन बेशद्ध करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा मेळघाट प्रकल्पात आणून उपचार करण्यात आले. २ सप्टेंबरला सायंकाळी कडेकोट बंदोबस्तात या वाघिणीची रवानगी गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात करण्यात आली. य वाहनांचा ताफा सायंकाळी गोरेवाडा प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर दाखल झाला. वैद्यकीय तपासण्यांनंतर तिला बचाव केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Gorewada Zooगोरेवाडा प्राणीसंग्रहालयTigerवाघ