शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यांवरील हल्ला प्रकरण : नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवर सव्वा महिन्यानंतर अंमल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:12 IST

महसूल कर्मचाऱ्यांवरील हल्लाप्रकरणी आरोपींवर दाखल कलमात वाढ करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवर नंदनवन पोलिसांनी तब्बल सव्वा महिन्यानंतर अंमल केला. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आयुक्त कार्यालयामार्फत नंदनवन पोलीस ठाण्याला पोहोचण्यासाठी तब्बल १५ दिवस लागले. जिल्हाधिकारीसारख्या अतिमहत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे पत्र शहरातल्या शहरात पोहोचण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागत असेल तर सामान्य नागरिकांच्या पत्रांना पोलीस विभाग किती गांभीर्याने घेत असेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ठळक मुद्देनंदनवन ठाण्याला १५ दिवसानंतर पोहोचले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महसूल कर्मचाऱ्यांवरील हल्लाप्रकरणी आरोपींवर दाखल कलमात वाढ करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवर नंदनवन पोलिसांनी तब्बल सव्वा महिन्यानंतर अंमल केला. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आयुक्त कार्यालयामार्फत नंदनवन पोलीस ठाण्याला पोहोचण्यासाठी तब्बल १५ दिवस लागले. जिल्हाधिकारीसारख्या अतिमहत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे पत्र शहरातल्या शहरात पोहोचण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागत असेल तर सामान्य नागरिकांच्या पत्रांना पोलीस विभाग किती गांभीर्याने घेत असेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.२३ एप्रिल रोजी खरबी रोड येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी महसूल विभागाचे पथक गेले होते. कारवाईसाठी गेलेल्या पथकावर वाळू माफियाने अंगावर वाहन चढविण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. वाळू माफियाने कर्मचाऱ्यांना शिवीगाळही केली. तसेच सर्व अवैध ट्रकही पळवून लावले. नंदनवन येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून सहकार्य मिळाले नाही. पोलिसांनी कर्मचाऱ्यांना अनेक तास बसवून ठेवल्याची माहिती आहे. तसेच तक्रारीत नमूद असताना अंगावर वाहन चढविण्याचा प्रयत्न केल्याचे कलमच लावले नाही. फक्त आयपीसीचे कलम ३५३ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांचे अवैध वाळू वाहतुकीला पाठबळ असल्याचा आरोप महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांशी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पत्रव्यवहार केला. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र नंदनवन पोलिसांना पाठविले. नंदनवन पोलिसांना १५ दिवसानंतर म्हणजे १८ मे रोजी मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार यानंतर पोलिसांनी गुन्ह्यात वाढ करण्याच्या उद्देशाने आवश्यक बयाण नोंदविण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांना बोलावले. मात्र मतमोजणीचे कारण पुढे करीत कर्मचारी गेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानंतर जवळपास सव्वा महिन्याने नंदनवन पोलिसांनी कलमांमध्ये वाढ केली.बयाण न घेताच कलमात वाढजिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानंतर तक्रार अधिकारी नायब तहसीलदार सुनील साळवे यांना बयाण नोंदविण्यासाठी नंदनवन पोलिसांनी बोलावले होते. मात्र मतमोजणी असल्याने ते गेले नाही. बयाणच नव्याने नोंदविण्यात आले नसल्याने साळवे यांनी सांगितले. असे असताना पोलिसांनी आयपीसीच्या ३०७, १२० (ब),१५२,५०४,५०६,१०९ व माईन्स अ‍ॅण्ड मिनरल अ‍ॅक्ट १९५७ चे कलम २१ (१), २१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. बयाण न घेताच गुन्ह्यात वाढ केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयPolice Stationपोलीस ठाणे