शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशावरील हल्ला : जामीन दिल्यास पराते दबाव निर्माण करतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 21:28 IST

पाचवे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश किरण देशपांडे यांना मारहाण करणारे सहायक सरकारी वकील अ‍ॅड. दीपेश मदनलाल पराते हे जामीन मंजूर झाल्यानंतर स्वत:ला वाचविण्यासाठी साक्षीदारांवर दबाव निर्माण करू शकतात असा दावा राज्य सरकारने गुरुवारी सत्र न्यायालयासमक्ष केला.

ठळक मुद्देराज्य सरकारचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाचवे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश किरण देशपांडे यांना मारहाण करणारे सहायक सरकारी वकील अ‍ॅड. दीपेश मदनलाल पराते हे जामीन मंजूर झाल्यानंतर स्वत:ला वाचविण्यासाठी साक्षीदारांवर दबाव निर्माण करू शकतात असा दावा राज्य सरकारने गुरुवारी सत्र न्यायालयासमक्ष केला.पराते यांनी सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असून त्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.जी. रघुवंशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, राज्य सरकारने पराते यांना जामीन मंजूर करण्यास जोरदार विरोध केला. पराते यांनी न्यायाधीशांना मारहाण केली असून ही घटना अतिशय गंभीर आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर ते साक्षीदारांवर दबाव निर्माण करतील व पुरावे नष्ट करतील. तसेच, ते खटल्यावरील सुनावणीला अनुपस्थित राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही असे सरकारने न्यायालयाला सांगितले.पराते यांच्या वकिलांनी या प्रकरणात भादंविच्या कलम ३५३ (कर्तव्यावरील सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला करणे) अंतर्गत गुन्हा नोंदविला जाऊ शकत नाही याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. फिर्यादी न्या. देशपांडे हे घटनेच्या दिवशी सुटीवर होते. तसेच, ही घटना जिल्हा न्यायालय इमारतीच्या वऱ्हांड्यात घडली असे त्यांनी हा दावा करताना स्पष्ट केले. पराते यांच्याविरुद्धचा हा एकमेव गुन्हा अजामीनपात्र आहे. पराते यांच्यातर्फे अ‍ॅड. मंगेश मून व अ‍ॅड. योगेश मंडपे तर, सरकारतर्फे अ‍ॅड. जी.एन. दुबे यांनी कामकाज पाहिले.जामिनावर आज निर्णयसत्र न्यायालयाने अर्जावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवला. निर्णयासाठी हे प्रकरण शुक्रवारी ठेवण्यात आले आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वकिलाने न्यायाधीशांना मारहाण केल्यामुळे ही घटना राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे.पराते यांचा एमसीआरप्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी पराते यांना न्यायालयीन कोठडीत (एमसीआर) धाडले. बुधवारी, सदर पोलिसांना त्यांची एक दिवसाची पोलीस कोठडी (पीसीआर) मंजूर करण्यात आली होती. या प्रकरणात सदर पोलिसांनी एफआयआर नोंदविल्यानंतर पराते यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला होता. परंतु, पराते यांच्या ‘पीसीआर’मुळे त्यावर सुनावणी होऊ शकली नाही. पराते यांना ‘एमसीआर’ झाल्यानंतर सत्र न्यायालयाने या अर्जावर सुनावणी घेतली.

 

टॅग्स :Courtन्यायालयadvocateवकिल