शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांवर तुटून पडा : नागपूर पोलीस आयुक्तांचे ठाणेदारांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 22:18 IST

गुन्हेगारांना तुरुंगात पोहोचवण्यासाठी तुटून पडा. शहरात सक्रिय असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीची संपूर्ण कुंडली तयार करा, त्यांच्याविरुद्ध मकोका, एमपीडीए आणि तडीपारची कारवाई करा, असे निर्देश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिले. बुधवारी आयोजित मासिक गुन्हे बैठकीत ठाणेदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा केली. तसेच गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह मोहीम कडक करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हेगारांना तुरुंगात पोहोचवण्यासाठी तुटून पडा. शहरात सक्रिय असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीची संपूर्ण कुंडली तयार करा, त्यांच्याविरुद्ध मकोका, एमपीडीए आणि तडीपारची कारवाई करा, असे निर्देश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिले. बुधवारी आयोजित मासिक गुन्हे बैठकीत ठाणेदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा केली. तसेच गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले.ट्रान्सपोर्टर बॉबी माकन हत्याकांडानंतर शहरातील गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गँगस्टर लिटील सरदारसह चार आरोपींना अटक केली आहे. त्याचा सहकारी मंजित वाडे फरार आहे. बॉबीच्या हत्याकांडात पाचपावलीतील गुन्हेगार आणि इप्पा गँगचा एक सदस्य आणि शहरातील एक चर्चित गँगस्टरचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस आयुक्तांनी ठाणेदारांना घटना घडण्याची वाट न पाहता गुन्हेगारांविरुद्ध स्वयंस्फूर्तीने कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. ते म्हणाले, मोठे गुन्हेगार टोळी बनवून गुन्हे करीत असतात. अशा वेळी टोळीची माहिती एकत्र करावी. एमपीडीएच्या कारवाईला प्राधान्य द्यावे. तडीपार गुंडांना कुठल्याही परिस्थितीत शहरात घुसू देऊ नये. लुटमार करणाºया गुन्हेगारांवर सातत्याने लक्ष ठेवावे. पोलिसांचे लक्ष हटताच गुन्हेगार चेन स्नॅचिंग व लुटमार करीत असतात. चेन स्नॅचिंगच्या घटनांनाही गांभीर्याने घ्यावे. चेन स्नॅचिंगप्रकरणी चोरीचा गुन्ह्याऐवजी लुटमारीचा गुन्हा दाखल करावा, असे निर्देशही पोलीस आयुक्तांनी दिले.डॉ. उपाध्याय यांनी तहसील ठाणे परिसरातील गोळीबार चौकात झालेल्या चोरीच्या घटनेलाही गांभीर्याने घेत आरोपींचा पत्ता लावण्याचे निर्देश दिले. त्यांनी ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह मोहीम आणखी कडक करण्याचे निर्देश दिले. वाहन चोरीच्या घटनांनाही गांभीर्याने घेण्यास सांगितले. अशा प्रकरणात तक्रारकर्त्यास मूळ कागदपत्र आणून दाखवण्याच्या नावावर टाइम पास केला जातो. इतक्या वेळात चोरीचे वाहन दुसऱ्या राज्यात पोहोचले. अशा प्रकरणात कार्यशाळा आयोजित करून पोलिसांचे मार्गदर्शन करण्यासही सांगितले.रस्त्यांवर दारू पिणाऱ्यांवर कडक कारवाईसार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचे निर्देश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिले. दारुच्या नशेत क्षुल्लक वादातही हत्येसारखी गंभीर घटना घडत असते. अशावेळी कायदा व सुव्यवस्थेसह नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो.लाचखोरी सहन करणार नाहीलाच मागितल्याची तक्रार आल्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिले. लाचेसाठी नागरिकांना त्रास देण्याची प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही. यामुळे पोलिसांची प्रतिमा खराब होते. पोलिसांच्या कार्यात सेवेची भावना असायला हवी, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालयPolice Stationपोलीस ठाणे