शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंच्या तोडपाणीत अडकलेले पोलीस मुख्यालयात संलग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - धान्याचा काळाबाजार करणाऱ्याची गाडी पकडून कारवाईचा धाक दाखवीत लाखोंची तोडी केल्याचे उघड झाल्यानंतर पोलीस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - धान्याचा काळाबाजार करणाऱ्याची गाडी पकडून कारवाईचा धाक दाखवीत लाखोंची तोडी केल्याचे उघड झाल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी निलंबित केलेल्या यशोधरानगर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक श्रीनिवास दराडे, हवालदार मनीष भोसले, पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार पाल आणि शिपाई प्रसेनजित जांभूळकर या चाैघांची पोलीस मुख्यालयात रवानगी करण्यात आली. दरम्यान,

लोकमतने मंगळवारी चाैघांच्या निलंबनाचे आणि खाबूगिरीचे वृत्त प्रकाशित केल्याने शहरभर खळबळ उडाली. लोकमतच्या वृत्ताचे डिजिटल कात्रण शहरातील पोलिसच नव्हे तर विविध व्हाॅट्‌सॲप ग्रुपवर व्हायरल झाले. त्यानंतर या आणि अशाच प्रकरणात जुळलेल्या एका पोलिसानेच हे घडवून आणल्याची बाब आज शहर पोलीस दलात चर्चेला आली.

शहरातील काही पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेशनच्या काळाबाजाराचा धंदा जोरात सुरू आहे. त्याला सुपारीचीही जोड आहे. काही पोलीस ठाण्यातील जुने खेळाडू धान्य आणि सुपारीवाल्यांची सेटिंग करून देत त्यांच्या गोरखधंद्याला संरक्षण मिळवून देतात. बदल्यात महिन्याला लाखोंची तोडपाणी करतात. मोठी देण देऊनही कारवाई झाली तर गोरखधंदा करणारा संतापतो. या प्रकरणात असेच झाले. धान्याच्या काळाबाजारात गुंतलेल्या मदानची गाडी पकडली. ८० हजार रुपये (रेकॉर्डवर) घेतले अन् नंतर मुलाला बेदम मारहाणही केली. त्यामुळे त्याने थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदवली. आयुक्तांनी उपायुक्त नीलोत्पल यांच्याकडे चाैकशी सोपविली अन् त्यातून उपनिरीक्षक श्रीनिवास दराडे, हवालदार मनीष भोसले, पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार पाल आणि शिपाई प्रसेनजित जांभूळकर या चाैघांचे निलंबन झाले.

---

पडद्यामागचा खेळाडू मुख्यालयात

लोकमतने या प्रकरणाची आणि चाैघांच्या निलंबनाचे वृत्त आज प्रकाशित केल्यानंतर एकच खळबळ उडाली. या आणि अशाच प्रकरणात गुंतलेला एक पोलीस कर्मचारी या घडामोडीमागे असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पडद्यामागचा हा खेळाडू पोलीस मुख्यालयात कार्यरत असल्याचेही संबंधितांनी म्हटले आहे. त्यानेच तक्रार करण्यासाठी संबंधितांना दिशा दिल्याचीही चर्चा आहे.

---