शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

वडेट्टीवार, धानोरकर यांच्या विरोधात ‘अ‍ॅट्रॉसिटी’ लावा : महिला मोर्चातर्फे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 9:53 PM

राजुरा येथील इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूलमधील वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक शोषणाचे राजकीय पडसाद उमटायला लागले आहेत. या घटनेविरोधात भाजपाच्या महिला मोर्चातर्फे मंगळवारी संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. शिवाय या प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आ. विजय वडेट्टीवार, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर व कॉंग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्याविरोधात ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे.

ठळक मुद्देराजुरा लैंगिक शोषण प्रकरणात भाजपा आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजुरा येथील इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूलमधील वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक शोषणाचे राजकीय पडसाद उमटायला लागले आहेत. या घटनेविरोधात भाजपाच्या महिला मोर्चातर्फे मंगळवारी संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. शिवाय या प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आ. विजय वडेट्टीवार, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर व कॉंग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्याविरोधात ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे.मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास संविधान चौकात महिला मोर्चाच्या अध्यक्षा कीर्तीदा अजमेरा, प्रदेश महिला मोर्चा महामंत्री अर्चना डेहनकर यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. यानंतर मागण्याचे निवेदन पोलीस महानिरीक्षक के.एम.प्रसन्ना यांना देण्यात आले. राजुरा येथील घटना घृणास्पद आहे. मात्र शासनाने या प्रकरणात त्वरित योग्य पाऊल उचलले आणि आरोपींना अटक केली. पीडित मुलींना न्याय व पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासनदेखील देण्यात आले आहे. मात्र या प्रकरणाला कॉंग्रेसतर्फे चुकीची दिशा देण्याचे काम करण्यात येत आहे. शासकीय मदतीसाठी व पैशांच्या लोभापायी पीडितांच्या पालकांकडून पोलिसात तक्रार देण्यात येत आहे, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार, बाळू धानोरकर व संस्थाचालक सुभाष धोटे यांनी केले. कॉंग्रेसच्या नेत्यांनी आदिवासी व दलित समाजाचा अपमान केला आहे. आदिवासी महिला कधीही पैशांसाठी खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. ही मानसिकता कॉंग्रेस नेत्यांची आहे. त्यामुळेच असे वक्तव्य करण्यात आले, असा आरोप अजमेरा यांनी केला. तिघांविरोधातही ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली. यावेळी संध्या ठाकरे, सीमा ढोमणे , वंदना शर्मा , पूजा तिवारी, कंचन करमरकर, संगीता देशमुख, संगीता पाटील, अनिता मिश्रा, मंगला पाटील, महिमा दभरी, कल्पना पजारे, राणी रेड्डी, राजश्री दाउदखानी, ज्योति वर्मा इत्यादी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

टॅग्स :agitationआंदोलनWomenमहिलाVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार