शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी अधिकाऱ्यांमध्ये जातीवरून भेदभाव करतो अ‍ॅट्रॉसिटी कायदा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:02 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावरून देशभरातील वातावरण तापलेले असताना या कायद्यातल्या कलम ४(१) मधील तरतुदीच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. संबंधित तरतूद सरकारी अधिकाऱ्यांमध्ये जातीवरून भेदभाव करते. त्यामुळे ती तरतूद घटनाबाह्य ठरवून रद्द करण्यात यावी अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवादग्रस्त तरतुदीला आव्हान : घटनाबाह्य घोषित करण्याची विनंती

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावरून देशभरातील वातावरण तापलेले असताना या कायद्यातल्या कलम ४(१) मधील तरतुदीच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. संबंधित तरतूद सरकारी अधिकाऱ्यांमध्ये जातीवरून भेदभाव करते. त्यामुळे ती तरतूद घटनाबाह्य ठरवून रद्द करण्यात यावी अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.गोंदिया जिल्ह्यातील सचिन सोनवणे, प्रेमेश्वर सोनवणे व भाऊराव सोनवणे यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील कलम ४(१) मध्ये, अनुसूचित जाती/जमातीबाहेरच्या सरकारी अधिकाऱ्यांना, हा कायदा व त्याअंतर्गत लागू नियमांनुसार कर्तव्य बजावण्यात जाणीवपूर्वक निष्काळजीपणा केल्यास, ६ महिने ते १ वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा सुनावण्याची तरतूद आहे. ही तरतूद २६ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात आली आहे. ही तरतूद घटनाबाह्य असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.राज्यघटनेतील अनुच्छेद १४ मध्ये सर्वांना समानतेचा अधिकार देण्यात आला आहे. अनुच्छेद १५ अनुसार धर्म, पंथ, जात, लिंग व जन्मस्थळावरून कुणामध्येही भेदभाव करता येत नाही. राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये हा देश धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, नागरी सेवा नियम कर्मचाऱ्यांमध्ये जात व धर्मावरून भेदभाव करीत नाही. असे असताना कलम ४(१) मध्ये अनुसूचित जाती/जमातीमधील व इतर जातीमधील अधिकाऱ्यांत भेदभाव करणारी तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद दुर्भावना मनात ठेवून कार्य करणाºया व प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये काहीच फरक करीत नाही. ही तरतूद अनुसूचित जाती/जमातीच्या अधिकाऱ्यांना विशेषाधिकार देणारी आहे. अनुसूचित जाती/जमातीच्या अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केला तरी, त्यांना शिक्षा होणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर कायद्याचा वचक राहणार नाही. या सर्व बाबी लक्षात घेता कलम ४(१) मधील तरतूद रद्द करण्यात यावी असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.राज्य सरकारला नोटीसउच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व मुरलीधर गिरटकर यांनी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर राज्य सरकारला नोटीस बजावून यावर २३ जुलैपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. रजनीश व्यास यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा