बेला : तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना बेला (ता. उमरेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चनाेडा येथे शनिवारी (दि. १७) उघड झाली. पाेलिसात तक्रार दाखल हाेताच आराेपीस अटक करण्यात आली.
स्वप्निल गंगाधर गायधने (२५, रा. चनाेडा, ता. उमरेड) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. स्वप्निलने त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने तिच्याशी एप्रिल २०२१ पासून शरीरसंबंध प्रस्थापित केले. यातून ती गर्भवती राहिली. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी स्वप्निलला तिच्याशी लग्न करण्याची वारंवार विनंती केली. त्याने लग्न करण्यास नकार देताच पीडित तरुणीने शनिवारी सायंकाळी पाेलीस ठाणे गाठून तक्रार नाेंदविली. या प्रकरणी बेला पाेलिसांनी भादंवि ३७६ (२) (एन), ५०६ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपी स्वप्निलला अटक केली. या घटनेचा तपास ठाणेदार पंकज वाघाेडे करीत आहेत.