लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नातेसंबंधातील एका ९ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणा-या नराधमाविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सूरज राजू गायकवाड असे त्याचे नाव आहे. तो अजनी परिसरात राहतो. बाजुलाच त्याचे नातेवाईक राहतात. पीडित मुलीचे आईवडील कामाला जातात. त्यामुळे दुपारी शाळेतून घरी परतल्यानंतर ती एकटीच घरी राहते. ५ मार्चला दुपारी १ वाजता आरोपी सूरज तिच्या घरी आला. बालिका एकटीच असल्याचे पाहून त्याने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुणाला काही सांगितल्यास ठार मारेन, अशी धमकी देऊन बालिकेला गप्प केले. जीवाच्या धाकाने ती गप्प बसल्याचे पाहून तो नेहमी घरी येऊन बालिकेवर अत्याचार करू लागला. सततच्या अत्याचारामुळे तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे आईने तिला विचारले असता ही संतापजनक घटना उघड झाली. पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपी सूरज गायकवाडविरुद्ध बलात्कार, धमकी देणे आणि पोक्सो कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक झाली की नाही, ते वृत्तलिहिस्तोवर स्पष्ट झाले नव्हते.
नागपुरात ९ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:53 IST
नातेसंबंधातील एका ९ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणा-या नराधमाविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
नागपुरात ९ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार
ठळक मुद्देअजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना